Agriculture Success Story : एकीच्या बळावर पाटील बंधूंची नेत्रदीपक भरारी ; ५ एकरांपासून ८० एकरांपर्यंतचा प्रवास

Indian Agriculture : जळगाव जिल्ह्यातील दोनगाव येथील शांताराम, युवराज, भीमराव व गंभीर या चार पाटील बंधूंनी एकीच्या बळावर शेती व पूरक व्यवसाय यातून नेत्रदीपक प्रगती साधली आहे. एकेकाळी पाच एकर असलेले क्षेत्र मेहनतीतून ८० एकरांवर नेले आहे. सुमारे ३५ म्हशींच्या संगोपनासह डेअरी व दुधाची थेट विक्री यातून दुग्ध व्यवसायात यश मिळवले आहे.
Indian Farmer Family
Agriculture Story Agrowon
Published on
Updated on

Agriculture Growth By Joint Agriculture Family : जळगाव जिल्ह्यात दोनगाव (ता. धरणगाव) येथे  शांताराम, युवराज, भीमराव व गंभीर या पाटील  बंधूंचे एकत्रित कुटुंब गुण्यागोविंदाने नांदते आहे. शेती व दुग्धव्यवसाय असा मिलाफ साधत त्यांनी शेती यशस्वी केली आहे.

त्यांच्या या यशामागे वडील उत्तमरावांचे कष्ट, जिद्द, अनेक अडचणींवर मात करीत पुढे जाण्याची वृत्ती या बाबींचा मोठा वाटा आहे. हेच संस्कार मुलांनी आत्मसात करीत आपल्या शेतीला आणखी पुढे नेत एकजुटीने प्रगती साधली आहे.

उत्तमरावांची पूर्वी केवळ पाच एकर शेती होती. तीही हलकी, मध्यम, कोरडवाहू होती. ते पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. देशी कापूस, उडीद, मूग आदी पिके असायची. चार मुले व दोन मुलींचा सांभाळ करण्याची जबाबदारी होती. मोठ्या आर्थिक व अन्य अडचणी होत्या. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण व्हायचे.

पुढे त्यांची मुले मोठी झाली. त्यांनाही शेतीत राबण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यामुळे शिक्षणावर मर्यादा आल्या. घरच्या शेतीचे काम आटोपल्यानंतर चौघे बंधू मजुरीसाठी अन्य शेतकऱ्यांकडे जायचे. त्यासाठी गावापुरतेच नव्हे तर नजीकच्या कानळदा, ममुराबाद वा अन्य भागातही जावे लागे.

Indian Farmer Family
Agriculture Success Story : ‘पुसला’च्या बिडकर भगिनींनी जपला लढवय्या बाणा

पशुधनाचा सुरुवातीपासून लळा

घरात पशुपालन त्या वेळेसही होते. परंतु संख्या मोजकी होती. घरी दुधासह शेतात शेणखतासाठी उपयुक्त ठरतील म्हणून म्हशींचे संगोपन व्हायचे. हळूहळू दुग्ध व्यवसायातील कामांमध्ये पाटील बंघू पारंगत झाले.

या व्यवसायातील बारकावे, अडचणी, गरजा आदी बाबी त्यांना किशोरवयातच लक्षात आल्या. घरात भाजीपाला, डाळी बारमाही नसायच्या. अनेकदा तेलही नसायचे. अशा वेळेस दूध - भाकर हाच अन्न म्हणून मोठा आधार असायचा. यातूनच पशुधनाचा लळा अधिक घट्ट झाला.

व्यावसायिक दृष्टिकोन जपला

म्हशींची संख्या वाढवून व्यावसायिक दृष्टिकोनातून दुग्धोत्पादन करूयात असा प्रस्ताव पाटील बंधूंनी वडिलांकडे दिला. खरे तर ती जोखीमच होती. कारण गावात दुधाची विक्री शक्य नव्हती. एवढी ग्राहक संख्या मिळवणे, आर्थिक नियोजन व मनुष्यबळ उपलब्ध करणे कठीण होते.

शेती कोरडवाहू असल्याने पुरेसा बारमाही सकस चारा उत्पादित करणेही अवघड वाटत होते. परंतु घरातील सर्वांनी एका विचाराची मोट बांधली. सर्वांच्या शक्तीतून पुढे जायचे ठरवले. त्यातून १९९८ मध्ये व्यवसाय वृद्धीकडे पाऊल टाकले. घरच्या म्हशी व गावातील दुग्धोत्पादकांकडून दुधाची खरेदी सुरू केली.

गुणवत्तेचा आग्रह, प्रगती आली चालून

ग्राहकांना अस्सल गुणवत्ता दिल्यास, प्रामाणिकपणे कामकाज व कष्ट केल्यास व्यवसाय वाढण्यास वेळ लागत नाही. पाटील बंधूंनी तेच केले. व्यवसायासाठी दुचाकी घेतली. त्याद्वारे दूध जळगावात नेऊन ते थेट ग्राहकांना देण्यास सुरवात केली. गुणवत्ता, दर्जा व सचोटीच्या बळावर दुधास मागणी येऊ लागली. व्यवसाय भरभराटीस येऊ लागला. पुढे दूध संकलनही वर्षागणिक वाढत गेले.

Indian Farmer Family
Agriculture Success Story : प्रयोगशील शेतीमुळे नाईक बनले आदर्श शेतकरी

काही पैदास गोठ्यात तर काही खरेदी करणे या पद्धतीने म्हशींची संख्या वाढू लागली. आज लहान-मोठ्या मिळून सुमारे ४० ते ४५ पर्यंत म्हशी आहेत. जाफराबादी हे मुख्य वाण आहे. दोन्ही वेळचे मिळून दररोज घरचे १७० लिटर तर गावातील शेतकऱ्यांकडून ६० ते ७० लिटर असे एकूण दूध संकलन साध्य केले जाते. गावातील स्वतःची डेअरी व जळगाव येथे थेट रतीब अशी विक्री व्‍यवस्था जपली आहे. दुधाची गुणवत्ता टिकवल्याने काही ग्राहक २२ वर्षांपासून पाटील बंधूंसोबत जोडले गेले आहेत.

शेतीतून साधली प्रगती

कापसाचे सुमारे ६० एकर क्षेत्र असून मका, ज्वारी, हरभरा, कांदा अशी बहुविध पद्धती आहे. सर्व पिकांत कुटुंबाचा हातखंडा आहे. दुग्ध व्यवसाय, गोठा व्यवस्थापन, दूध संकलन, वितरण आणि पीक पद्धती अशा जबाबदाऱ्या कुटुंबातील सदस्यांनी वाटून घेतल्या आहेत.

पाच एकर शेती आता ८० एकरांपर्यंत वाढली आहे. पसारा वाढल्याने तीन ट्रॅक्टर घेतले. चार बैलजोड्या आहेत. ट्रॅक्टरद्वारे मशागतीचा व्यवसाय भाडेतत्त्वावर केला जातो. सुमारे साडेचार हजार चौरस फुटात टुमदार, देखणे दुमजली घर बांधले आहे.

दुग्धव्यवसायातून महिन्याला ५० ते ५५ टक्के व शेतीतून वर्षाला त्या दरम्यान नफा होतो. नैसर्गिक आपत्ती, बाजारभावांची अस्थिरता यामुळे उत्पन्न अनेकवेळा घसरते. परंतु न डगमगता एकीतून या कुटुंबाने शेतीतील वाटचाल उत्साहाने सुरू ठेवलीआहे.

कुटुंबाची एकी

कुटुंबात तब्बल ३० सदस्य आहेत. सर्व जण गुण्यागोविंदाने एक राहतात. घरानजीकच गोठा आहे. सर्व निर्णय एकत्र बसून घेतले जातात. चौघा पाटील बंधूंना पाच मुले आहेत. सर्व जण शेतीतच गुंतले आहेत. नोकरीला कनिष्ठ समजून शेतीला श्रेष्ठ समजणारे हे कुटुंब आहे. नव्या पिढीचे महेश गंभीर पाटील यांना पुण्यात चांगली नोकरी होती. परंतु घरची शेती, दुग्ध व्यवसायातील करियरचे महत्त्व कुटुंबातील ज्येष्ठांनी त्यांना समजावून सांगितले. आज महेश गावातील डेअरी उत्तम प्रकारे सांभाळतात.

महेश पाटील ७३८७८५३३३२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com