Old Age Home : ज्येष्ठांना ‘एक परिवार’चा आधार

Support For Seniors : पांगरा बोखारे (जि. हिंगोली) येथील गुलाबराव व नंदा या बोखारे दांपत्याने यांनी समाजसेवेची आवड जोपासताना एक परिवार या नावाने वृद्धाश्रमाची उभारणी केली आहे. दहा गुंठे क्षेत्रावर परिवाराचा निवारा असून, शिवाय उर्वरित क्षेत्रात नैसर्गिक पद्धतीने विविध पिकांची शेतीही केली जात आहे.
Support For Senior
Support For SeniorAgrowon

Ek Parivar Old Age Home : जिल्ह्यातील वसमत ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरून नांदेडकडे जाताना डाव्या बाजूला पळसगाव (ता. वसमत) शिवारात उभारण्यात आलेला रंगीत टीन पत्र्याचा निवारा प्रवाशांचे लक्ष वेधतो. या ठिकाणी काय असावे असा प्रश्‍न सहजच प्रवाशांना पडतो.

महामार्गावर लावलेला फलक वाचल्यानंतर हा निवारा म्हणजे एक परिवार वृद्धाश्रम असल्याचा उलगडा होतो. महामार्गापासून सुमारे २०० मीटरचा कच्चा रस्ता पार करून गेल्यास एक परिवार वृद्धाश्रमाच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतर तेथील कार्यालयातील फलकावरील कवितेतील -

आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे.
माळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे.
आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली.
संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे.

- या ओळी वृद्धाश्रमाचे बोध वाक्य म्हणून समर्पक ठरतील.
पांगरा बोखारे (ता. वसमत) येथील गुलाबराव बोखारे हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात शाखा अभियंता ते उपअभियंता या पदावर १९८५ ते २०२१ पर्यंत सेवाकाल पूर्ण करून निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर ते गावी असलेली आठ एकर शेती करत उर्वरित आयुष्य आरामात जगता आले असते.

Support For Senior
Robotics Farming : रोबोटिक शेतीचे दिवस दूर नाहीत

परंतु त्यांना पूर्वीपासून असलेली समाजसेवेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला मूर्त स्वरूप आले. त्यांच्या पत्नी सौ. नंदा बोखारे यांची देखील समाज सेवेसाठी खंबीर साथ मिळाली. उर्वरित आयुष्य निराधार ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेला समर्पित करण्याची खूणगाठ बोखारे दांपत्याने बांधली आहे.

पदरमोड करून वृद्धाश्रमाची उभारणी...

मानव सेवा हीच ईश सेवा मानून समाजाच्या ऋणातून उतराई व्हावे यासाठी मातोश्री चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत २ जानेवारी २०२३ रोजी एक परिवार वृद्धाश्रम स्थापन केला आहे. सेवानिवृत्तीनंतर गुलाबरावांना मिळालेली ३० लाख रक्कम त्यांनी या सामाजिक कार्यासाठी खर्च केली आहे. वसमत नांदेड राष्ट्रीय महामार्गालगत पळसगाव शिवारात एक एकर जमीन खरेदी केली. या जागेवर टीन पत्र्याचा १०० बाय ३५ फूट आकाराचा निवारा उभाराला.

Support For Senior
Water Level : कोरड्या पडणाऱ्या प्रकल्पांच्या संख्येत दिवसेंदिवस भर

सभोवती तारेचे संरक्षक कुंपण तयार केले. कार्यालय, महिला, पुरुष यांना राहण्यासाठी स्वतंत्र कक्ष, स्वयंपाकघर आदी कक्ष तयार केले. पाण्याच्या सुविधेसाठी दोन बोअर खोदले. स्वच्छतागृहाची सुविधा आहे. वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र रोहित्र बसविण्यात आले आहे.
सध्या एक परिवार मध्ये ५ महिला व १० पुरुष असे १५ ज्येष्ठ नागरिक आहेत.

पुरुष व महिला वृद्धांना आराम करण्यासाठी वेगवेगळे कक्ष आहेत. कक्षामध्ये कॉट, गादी, पांघरूण, मच्छरदाणी, फॅनची सुविधा आहे. प्रत्येक सदस्यास कापड तसेच अन्य साहित्य ठेवण्यासाठी पेटी दिलेली आहे. या ज्येष्ठांना दररोज सकाळी व दुपारी चहा, सकाळ व संध्याकाळी जेवण दिले जाते.

३० गुंठ्यांवर शेती...

१० गुंठे क्षेत्रावर एक परिवाराचा निवारा आहे. उर्वरित ३० गुंठे क्षेत्रावर विविध पिकांची लागवड केली आहे. २५ गुंठ्यांवर रब्बी ज्वारीचे पीक घेतले आहे. ४ ते ५ गुंठे जागेत वांगी, मेथी, कांदा, लसूण, शेवगा आदी भाजीपाला पिके, लिंबू आदी फळझाडे, झेंडू तसेच अन्य फुलझाडांची लागवड केलेली आहे. नैसर्गिकरीत्या पिकविलेला ताजा भाजीपाल्याच्या दररोजच्या जेवणात समावेश असतो. ज्वारीपासून धान्य उपलब्ध होईल.

दानशूर व्यक्ती, संस्थाकडून मदतीचा हात...

अन्नधान्ये, किराणा या दैनंदिन गरजा तसेच वीजबिल खर्च, व्यवस्थापनासाठी असलेली कर्मचारी यावरील खर्च गुलाबराव हे त्यांचे निवृत्तिवेतन तसेच समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांच्या दातृत्वातून येणाऱ्या रकमेतून भागवत आहेत. वसमत येथील मेडिकल असोसिएशनतर्फे आरोग्य तपासणी केली जाते.

गोळ्या, औषधी दिल्या जातात. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) नांदेड विभागाने सामाजिक दायित्व अंतर्गत एक परिवारास सौर पथदिवे, दूरचित्रवाणी, साउंड सिस्टिम, फर्निचर भेट दिले आहेत. शासकीय अनुदानासाठी अद्याप प्रस्ताव सादर केलेले नाही. त्यामुळे एक परिवार वृद्धाश्रमाला सामाजिक मदतीची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com