पपईमध्ये पपेन नावाचे एंझाइम असते. ज्यामुळे खाल्लेले अन्न पचन होण्यासाठी मदत होते.
पपई खाल्ल्यामुळे अपचन, बध्दकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
पपईमध्ये व्हिटामिन-सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे सर्दी-खोकल्याच्या आजारापासून बचाव होतो.
पपईमध्ये असणाऱ्या अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचा तजेलदार होते. तसेच त्वचेच्या सुरकुत्या कमी होतात.
यामधील अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. तसेच शरीरातील रक्त साफ होते.
पपईमध्ये व्हिटामिन-ए आणि बीटा कॅरोटीन असते. ज्यामुळे दृष्टी सुधारण्यासह डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
पपई खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि ह्रदय विकाराचा धोका कमी होतो.
पपईमध्ये कॅलरी कमी आणि फायबर अधिक असते. ज्यामुळे दिर्घकाळापर्यंत पोट भरल्यासारखे वाटते.