PM Kisan 21st Installment : पंजाबमध्ये आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पुराशी संबंधित घटनांमध्ये येथील मृतांचा आकडा ५५ वर गेला आहे. या कठीण काळात केंद्र सरकारने पंजाबमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता आगाऊ वितरित करण्यात येणार आहे..पंजाबमधील पूरग्रस्त भागांचा हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पंजाबसाठी १,६०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. ही रक्कम राज्यासाठी आधीच मंजूर केलेल्या १२ हजार कोटींच्या निधीव्यतिरिक्त आहे. तसेच त्यांनी राज्य आपत्ती निवारण निधीचा (SDRF) दुसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा आगामी हप्ता आगाऊ वितरित करणार असल्याचे जाहीर केले. यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला..PM Kisan 21st Installment : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळू शकते खुशखबर?; पीएम किसानच्या २१ व्या हप्त्यापूर्वी तुमचे स्टेटस तपासा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया.मोदी सरकारने नुकतीच जीएसटीमध्ये सुधारणा करत देशभरातील जनतेला मोठा दिलासा दिला. २२ सप्टेंबरपासून नवे जीएसटी दर लागू होतील. यामुळे दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू स्वस्त होतील. तसेच शेतकऱ्यांना दिवाळीत आणखी एक चांगली बातमी मिळू शकते. ती म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता. ज्याची शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा लागली आहे..PM Kisan Maan Dhan Yojana : ‘पीक किसान मानधन’’चे शेतकऱ्यांना महिन्याला ३ हजार मिळणार, जाणून घ्या अर्ज कसा करावा?.२ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता वितरीत केला. यावेळी ९.७१ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात एकूण २०,५०० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. आता देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष पीएम किसान सन्मानच्या २१व्या हप्त्याकडे लागले आहे..दिवाळीच्या आधी मिळू शकतो २१ वा हप्तासरकारकडून ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीएम किसान सन्मान निधीची रक्कम जमा केली जाते. २०२४ मध्ये १८ वा हप्ता ५ ऑक्टोबर रोजी जमा करण्यात आला होता. २०२३ मध्ये १५ नोव्हेंबरला आणि २०२२ मध्ये १७ ऑक्टोबरला हप्ता वितरित केला होता. यंदा दिवाळी २० ऑक्टोबरदरम्यानच्या आहे. यामुळे यावेळी सरकारकडून नोव्हेंबरमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जारी केला शकते. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.