Mahesh Gaikwad
आजकाल सर्वांनाच उजळ कांती हवी असते. तुम्हालाही पार्लरसारखा झटपट ग्लो हवा असेल, तर पुढील टीप्स नक्की फॉलो करा.
चेहऱ्याचा ग्लो वाढविण्यासाठी दिवसातून कमीत कमी ८ ग्लास पाणी प्यावे. हायड्रेशनमुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते.
आठवड्यातून २-३ वेळा चेहऱ्याला स्क्रब लावा. स्क्रबिंग मुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा उजळते.
दैनंदिन आहारामध्ये फळे, भाज्या यासह अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त आहाार घ्या. यामुळे चेहऱ्याचा नैसर्गिक गोरेपणा वाढतो.
उन्हात बाहेर जाताना चेहऱ्याला सनस्क्रीन लावा. यामुळे प्रखर सुर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.
दररोज चेहऱ्याला मॉइश्चुरायझर किंवा व्हिटामिन-सी सीरम लावल्यास चेहऱ्याचा उजळपणा वाढतो.
दररोज किमान ७-८ तासांची झोप घ्या. पुरेशी झोप घेतल्यामुळे त्वचेची सेल रिन्यूअल वाढून डार्क सर्कल कमी होतात आणि त्वचा चमकदार होते.