Summer Heat : उन्हाचा चटका वाढणार

पावसाळी वातावरण निवळू लागताच राज्यात उन्हाची ताप वाढू लागली आहे. कमाल तापमानात आणि उकाड्यात वाढ झाली आहे.
Summer Heat
Summer Heat Agrowon
Published on: 
Updated on: 

Weather Update पुणे : पावसाळी वातावरण (Rainy Climate) निवळू लागताच राज्यात उन्हाची ताप (Heat) वाढू लागली आहे. कमाल तापमानात आणि उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. २७) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा (Dry Weather) अंदाज असून, राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच असून, उकाड्यात वाढ सुरूच आहे. रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी वर्धा ३७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सोलापूर, अकोला, अमरावती येथे कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे होते. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३६ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानातही चढ-उतार होत असून, बहुतांश ठिकाणी पारा १२ अंशांच्या पुढे कायम आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान १० अंश सेल्सिअस तापमानाचा नोंद झाली.

Summer Heat
Weather Station : पीकनुकसान मदतीसाठी स्वयंचलित हवामान केंद्र

उत्तर प्रदेश पासून, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते तमिळनाडू पर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले आहेत. आज (ता. २७) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला.

Summer Heat
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील एल निनोची स्थिती काय?

रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.८ (१२.५), जळगाव ३५.० (१८.७), धुळे ३४.५ (१२.८), कोल्हापूर ३५.५ (१९.१), महाबळेश्वर २९.१ (१५.२), नाशिक ३१.३ (१५.६), निफाड ३३.०(१०.०), सांगली ३५.४ (१८.४), सातारा ३४.७ (१५.१),

सोलापूर ३७.८(२०.१), सांताक्रूझ ३०.७ (१९.४), डहाणू ३०.९ (१९.०), रत्नागिरी ३३.८ (२१.०), छत्रपती संभाजीनगर ३४.२ (१८.७),

नांदेड - (२३.२), परभणी ३७.१ (२१.७), अकोला ३७.४ (२१.४), अमरावती ३७.४(२१.१), बुलडाणा ३६.४ (२१.७), ब्रह्मपुरी ३६.४ (२१.७), चंद्रपूर - (२१.८), गडचिरोली ३४.२(१९.२),

गोंदिया ३५.६ (२१.६), नागपूर ३५.७ (२२.०), वर्धा ३७.९(२४.०), वाशीम ३५.४ (२०.४), यवतमाळ ३६.५ (२०.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com