Weather Update : राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या

Summer Heat Update : कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने राज्यात उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

Pune News : कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने राज्यात उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३७ अंशांच्या वर गेल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. आज (ता. १२) राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि उत्तर आंध्र प्रदेशात चक्राकार वाऱ्याच्या स्थिती आहेत. पश्चिम राजस्थानपासून आग्नेय मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात ढगाळ हवामानाची स्थिती कायम आहे. उन्हाचा चटका वाढल्याने झळा आणि उकाडा तापदायक ठरत घामटा निघत आहेत.

Weather Update
Weather Update : राज्यात उन्हाचा चटका वाढला; किमान आणि कमाल तापमानात आणखी वाढीची शक्यता

सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३९.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. विदर्भात कमाल तापमान ३८ अंशांच्या पुढे, तर राज्यात अनेक ठिकाणी ३७ अंशांच्या वर सरकले आहे. आज (ता.१२) उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Weather Update
Agriculture Weather : हवामान वायदे : जोखीम व्यवस्थापनातील नवीन अध्याय

सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.९ (१५.३), धुळे ३८.० (१३.०), जळगाव ३५.८ (१७.०), कोल्हापूर ३७.१ (२१.५), महाबळेश्वर ३०.९ (१८.८), मालेगाव ३७.८ (१५.४), नाशिक ३५.४ (१५.४), सांगली ३७.७ (१९.९), सातारा ३७.२ (१८.४), सोलापूर ३९.६ (२४.६), सांताक्रूझ ३४.७ (१९.२), डहाणू ३१.८ (१८.८), रत्नागिरी ३२.८ (२०.०),

छत्रपती संभाजीनगर ३५.४ (१८.१), नांदेड ३७.२ (२०.४), परभणी ३७.३ (२२.०), अकोला ३८.३ (१९.०), अमरावती ३७.२ (१९.४), बुलडाणा ३६.६ (२०.०), ब्रह्मपुरी ३७.३ (२२.२) चंद्रपूर ३६.२ (२०.८), गडचिरोली ३५.० (२०.०), गोंदिया ३५.८ (२१.२), नागपूर ३७.० (२२.१), वर्धा ३८.० (२१.९), वाशीम ३७.० (१७.६), यवतमाळ ३८.० (२१.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com