Summer Heat
Summer HeatAgrowon

Summer Heat Update : उन्हाचा चटका अन् घामाच्या धारा

Weather Update : अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांपार असल्याने उन्हाचा चटका अधिक तापदायक होत असून, उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.
Published on

Pune News : राज्यात कमाल तापमान सातत्याने वाढत असून, उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांपार असल्याने उन्हाचा चटका अधिक तापदायक होत असून, उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. आज (ता. ११) राज्यातील उन्हाची ताप कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैर्ऋत्य राजस्थान आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकमध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. उन्हाचा चटका वाढल्याने घराबाहेर पडणे तापदायक ठरत असतानाच, उकाडा वाढल्याने घामटा निघत आहेत.

Summer Heat
Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ शक्य

रविवारी (ता. १०) किमान तापमानाचा पारा वाढल्याने थंडी गायब झाली आहे. सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. विदर्भात कमाल तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले आहे. आज (ता.११) उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Summer Heat
Summer Heat Update : राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या

रविवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.९ (१४.८), धुळे ३५.५ (१०.४), जळगाव ३६.० (१३.५), कोल्हापूर ३६.७ (२१.३), महाबळेश्वर ३१.१ (१८.४), मालेगाव ३८.० (१६.८), नाशिक ३४.६ (१३.२), सांगली ३७.७ (२०.१), सातारा ३६.५ (१८.०), सोलापूर ३९.४ (२२.४), सांताक्रूझ ३५.२ (१९.५), डहाणू ३१.९ (१७.९), रत्नागिरी ३६.४ (१९.५),

छत्रपती संभाजीनगर ३४.८ (१७.१), नांदेड ३६.८ (२०.२), परभणी ३६.६ (१९.५), अकोला ३७.१ (१८.५), अमरावती ३६.० (२०.३), बुलढाणा ३५.४ (१९.०), ब्रह्मपूरी ३८.२ (२०.४) चंद्रपूर ३८.२ (१९.०), गडचिरोली ३६.० (१९.४), गोंदिया ३४.३ (१८.२), नागपूर ३५.२ (१८.४), वर्धा ३७.० (१९.६), वाशीम ३६.८ (१६.८), यवतमाळ ३८.५ (२१.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com