Heatwave
Heatwave Agrowon

Maharashtra Heatwave: उन्हाचा तडाखा! महाराष्ट्रातील तापमान उसळले

Heatwave Alert: राज्यात उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून अनेक ठिकाणी कमाल तापमान ३७ अंशांवर पोहोचले आहे. सोलापूर येथे सर्वाधिक ३८.९ अंश तापमानाची नोंद झाली असून, पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
Published on

Pune News: उन्हाळा हंगाम सुरू झाल्याने अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांपार पोहोचला आहे. उन्हाची चटका वाढल्याने सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ५) राज्यात कमाल तापमानाचा चढता आलेख कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. ४) आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे देशातील उच्चांकी ३९.५ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात सोलापूरसह जेऊर, परभणी, अकोला, चंद्रपूर येथे तापमान ३८ अंशांवर होते. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, ब्रह्मपुरी, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळ येथे तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पार पोहोचला होता.

Heatwave
Rain Alert: कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज; राज्यातील कमाल तापमानाचा पारा पुन्हा ३८ अंशाच्या पार पोचला

सूर्य तळपू लागल्याने तापमानात वाढ होत असतानाच काही ठिकाणी दुपारनंतर अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याने दिवस रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाल्याचे दिसून आले. आज (ता. ५) राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मंगळवारी (ता. ४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३७.७---१६

अहिल्यानगर---३५.८---१५.५

धुळे---३५.५---१७.२

जळगाव---३६---१७.२

जेऊर---३८.५---१७

कोल्हापूर---३७.१---२२.२

महाबळेश्‍वर---३१.७---१८.

Heatwave
Maharashtra Summer Forecast: कोकणात उष्णता आणि दमट हवामानाचा इशारा: उन्हाचा तडाखा कायम

मालेगाव---३५.८---१८.८

नाशिक---३६.३---१७.३

निफाड---३२.७---१३.३

सांगली---३७.९---२१

सातारा---३७.५---१९.१

सोलापूर---३८.९---२१.५

सांताक्रूझ---३५.३---२०.६

डहाणू---३३.१---२३

रत्नागिरी---३४.४---२१.८

छत्रपती संभाजीनगर---३७---२१

धाराशिव---३५.८---१९.४

परभणी---३८.०---१९.५

परभणी (कृषी)---३६.९---१४.८

अकोला---३८.६---१९.९

अमरावती---३६.८---१९.२

भंडारा---३६.४---१९

बुलडाणा---३५.०---२१.५

ब्रह्मपुरी---३७.९---१८

चंद्रपूर---३८---निरंक

गडचिरोली---३७.२---१८

गोंदिया---३५.८---१७

नागपूर---३६.९---१८.२

वर्धा---३७.७---२०.२

वाशीम---३५.४---निरंक

यवतमाळ---३७---१८.६

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१७---३८.६

मराठवाडा---१४.८---३८

पश्‍चिम महाराष्ट्र---१६.०---३८.९

उत्तर महाराष्ट्र---१३.३---३६.३

कोकण---२०.६---३५.३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com