
Pune News : मागील दोन आठवड्यांपासून राज्यातील बहुतांशी भागात थंडी गायब झाल्याची स्थिती आहे. मात्र राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये काही भागात थंडीत काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये तापमान जास्तच राहील, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.
राज्यातील काही भागात तीन दिवस थंडी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई शहर, ठाणे, जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिक जिल्हा तसेच नगर जिल्ह्यातील अकोला, संगमनेर, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर तालुका आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, कन्नड, सोयगाव तालुक्यात आजपासून तीन दिवस थंडी किंचित वाढण्याचा अंदाज आहे, असे खुळे यांनी स्पष्ट केले.
११ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी तसेच १७ आणि १८ फेब्रुवारी दरम्यान किंचित थंडीची शक्यता जाणवते. बदलत्या वाऱ्यांच्या पॅटर्ननुसार उत्तरेतील थंड वारे, फक्त उत्तर व उत्तर-वायव्य महाराष्ट्रापर्यंतच पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पहाटे ५ वाजेचे किमान तापमान काहीसे घसरून या भागात थंडी जाणवेल.
उर्वरित महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यात मात्र वातावरणात विशेष बदल जाणवणार नाही. पुणे, दक्षिण-नगर, उत्तर-सातारा जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून पहाटे ५ वाजेचे किमान तापमान सरासरीपेक्षा ४ अंशाने अधिक जाणवत आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यांच्या परिसरात थंडी पूर्णतः गायब झाल्यासारखे वाटत आहे, असेही खुळे यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंतच्या दोन आठवड्याच्या काळात अधून-मधून ठराविक दिशा न घेणारे, तर कधी वारंवार दिशा बदलणाऱ्या पण कमकुवत वाऱ्यांचे अस्थिर वहन महाराष्ट्रावर टिकून राहिले. याशिवाय अधून-मधून महाराष्ट्रावर हवेच्या उच्च दाबातून, प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे उत्तरेतील थंड वाऱ्यांना भिंतीसारखा अटकाव केला गेला.
पर्यायाने उत्तरेतील थंड वारे, महाराष्ट्रात पोहचलेच नाही. त्यामुळे काहीसे निरभ्र आकाश असूनही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून विशेष अशी थंडी जाणवली नाही. पहाटेचे
किमान तापमान भागपरत्वे जवळपास सरासरीपेक्षा १ ते २ अंश सेल्सिअसने अधिक राहूनही महाराष्ट्रात चढ- उताराच्या थंडीसह सकाळच्या वेळेस हवेत केवळ माफकच गारवा जाणवला, असेही खुळे यांनी सांगितले. जोपर्यंत सध्याचा महाराष्ट्रावरील वारा-वहनाचा पॅटर्न बदलत नाही व थंडीपूरक उत्तरेकडून वारा वहन होत नाही तोपर्यंत थंडीची शक्यता जाणवणार नाही, आसाही अंदाज खुळे यांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.