Maharashtra Rain Alert : दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

Rain Forecast : मॉन्सूनच्या परतीचा प्रवास अडखळला असतानाच, राज्यात पावसाने उघडीप दिली आहे.
Rain Alert
Rain AlertAgrowon
Published on
Updated on

Pune News : मॉन्सूनच्या परतीचा प्रवास अडखळला असतानाच, राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. ३०) दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. २४) राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागासह पंजाब आणि हरियानाच्या काही भागातून मॉन्सून परतला. त्यानंतर मात्र मॉन्सून परतीची वाटचाल ‘जैसे थे’ आहे.

Rain Alert
Waiting For Rain : पुरंदरला अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा

नैॡत्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर, तसेच दक्षिण गुजरात आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहे. राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. रविवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Rain Alert
Monsoon Retreat Season : मॉन्सूनने मुक्काम हलविला

आज (ता. ३०) कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे.

सातारा, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, बीड, धाराशिव, लातूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com