Weather Update : महाराष्ट्रावर आज (ता.२९) १००८ हेप्टापास्कल, तर उद्या (ता. ३०) १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन काही काळ उघडीप व त्यानंतर एखाद्यावेळी हलका पाऊस होणे शक्य आहे. मंगळवारपासून गुरुवारपर्यंत (ता. १ ते ३ ऑक्टोबर) महाराष्ट्रावरील हवेचे दाब पुन्हा १००६ हेप्टापास्कल इतके होताच हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील. शुक्रवार आणि शनिवारी (ता. ४, ५ ऑक्टोबर) महाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१० हेप्टापास्कलपर्यंत वाढताच पावसात उघडीप राहण्याची शक्यता आहे. त्या वेळी बंगालचे उपसागरावरील हवेच्या दाबातही वाढ होऊन ते १०१० हेप्टापास्कल इतके अधिक होतील. तसेच उत्तर भारतात राजस्थान, पंजाब, हरियाना, दिल्ली, मध्यप्रदेश आणि बंगालचे उपसागरावरील हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल होताच पावसात पुन्हा पूर्ण उघडीप राहण्याची शक्यता आहे. त्यावेळी कमाल व किमान तापमानातही वाढ होईल. या काळात ‘ऑक्टोबर हीट’ जाणवण्यास सुरुवात होईल.
आज आणि उद्या आकाश पूर्णतः ढगाळ राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता चांगली राहील. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन काही काळ उघडीप, तर काही काळ हलक्या पावसाच्या सरी असे हवामान राहील.
प्रशांत महासागराचे विषुववृत्तीय भागात पेरुजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान १४ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २३ अंश सेल्सिअस इतके कमी राहील. त्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव येत्या काळात राहील. हिंदी महासागर व बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहण्यामुळे बाष्पीभवनाचा वेगात वाढ होईल.
कोकण
आज आणि उद्या (ता.२९,३०) सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ७ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात २ ते १० मि.मी., रायगड जिल्ह्यात ३ ते ७ मि.मी., ठाणे जिल्ह्यात ५ ते ९ मि.मी. व पालघर जिल्ह्यात ६ ते १९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत वायव्येकडून, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा वेग ताशी ४ ते ७ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहील. मात्र रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
आज आणि उद्या (ता.२९,३०) नाशिक जिल्ह्यात २ ते ५ मि.मी., धुळे जिल्ह्यात ५ ते ७ मि.मी., नंदुरबार जिल्ह्यात २ ते ६ मि.मी. व जळगाव जिल्ह्यात ६ ते ९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नाशिक व जळगाव जिल्ह्यांत वायव्येकडून, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग धुळे जिल्ह्यात ताशी १४ कि.मी., तर नाशिक, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ताशी ९ ते १२ कि.मी. राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, नंदुरबार जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७० टक्के राहील.
मराठवाडा
आज आणि उद्या (ता.२९,३०) धाराशिव व लातूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत अत्यल्प पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात १ ते २ मि.मी., तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २.५ ते ६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. त्यामुळेच पावसाचे प्रमाण कमी राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी १० ते १२ कि.मी. राहील. कमाल तापमान धाराशिव व परभणी जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर लातूर नांदेड, बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड व परभणी जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६२ टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
आज आणि उद्या (ता.२९,३०) बुलडाणा जिल्ह्यात २ ते ९ मि.मी., अकोला जिल्ह्यात १ ते ८ मि.मी., वाशीम जिल्ह्यात १ ते ४ मि.मी. व अमरावती जिल्ह्यात १ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहण्यामुळे पावसाचे प्रमाण कमीच राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १३ कि.मी. राहील. कमाल तापमान वाशीम जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, बुलडाणा जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, अमरावती जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस व अकोला जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६९ टक्के राहील.
मध्य विदर्भ
आज आणि उद्या (ता.२९,३०) यवतमाळ जिल्ह्यात १ मि.मी., वर्धा जिल्ह्यात १ ते ३ मि.मी. व नागपूर जिल्ह्यात १ ते ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते ११ कि.मी. राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ८९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ६६ टक्के राहील.
पूर्व विदर्भ
आज आणि उद्या (ता.२९,३०) चंद्रपूर जिल्ह्यात ०.८ ते १.२ मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात २.६ मिमी, भंडारा जिल्ह्यात १ ते २ मि.मी. आणि गोंदिया जिल्ह्यात १ मि.मी. प्रतिदिन पावसाची शक्यता राहील. पावसात बराच काळ उघडीप राहणे शक्य आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ताशी ६ ते १० कि.मी. राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर उर्वरित गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के राहील.
पश्चिम महाराष्ट्र
आज आणि उद्या (ता.२९,३०) कोल्हापूर जिल्ह्यात १ ते ३ मि.मी., सांगली जिल्ह्यात १ ते २ मि.मी., सातारा जिल्ह्यात १ मि.मी., पुणे जिल्ह्यात १.३ ते १.४ मि.मी व नगर जिल्ह्यात १ ते २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ताशी ७ ते ८ कि.मी., तर उर्वरित सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १३ कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर सांगली जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस व सोलापूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९६ टक्के ,तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ६४ टक्के राहील.
कृषी सल्ला
काढणी केलेल्या सोयाबीन, मूग, उडीद पिकाची सुरक्षित स्थळी साठवणूक करावी.
सततच्या पावसामुळे भाजीपाला व फळबाग लागवडीत साचलेले पाणी त्वरित चर खोदून बाहेर काढावे.
भात लागवडीच्या बांधावरील तणे काढून बांध तणमुक्त ठेवावेत.
फळबागांमध्ये तणनियंत्रण करून घ्यावे.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.