Maharashtra Rain Alert: आज ५ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; राज्यातील अनेक भागात तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात

Weather Update: राज्यात हवामान बदलत असून काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे, तर इतर भागांत तापमान वाढत असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
Weather
Weather Agrowon
Published on
Updated on

Pune News: राज्यातील काही ठिकाणी आजही पावसाला पोषक हवामान होते. तर इतर भागात आज उन्हाचा चटका जाणवला. कोकणातील सर्वच जिल्ह्यांना पुढील ५ दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगाडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट जारी केला.

Weather
Maharashtra Weather: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला. 

Weather
Unseasonal Rain Alert: राज्यात आजही वादळी पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अवकाळीसाठी पोषक हवामान

सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला. तसेच या भागात ढगाळ हवामान राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

राज्यातील इतर भागात पावसाचे वातावरण निवळले आहे. त्यामुळे तापमानात पुन्हा वाढ दिसून येत आहे. राज्यातील तापमानात सुधारणाही दिसू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com