
Pune News: ढगाळ हवामान, पावसाची हजेरी यामुळे राज्याच्या कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. तापमानाचा पारा ३८ अंश व त्यापेक्षा खाली घसरला आहे. आज (ता. ५) कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र परिसरावरील चक्राकार वारे, नैर्ऋत्य मध्य प्रदेशापासून दक्षिण अंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट झाली.
शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे उच्चांकी ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी, धुळे येथे ३८ अंशांपेक्षा अधिक, तर जळगाव, मालेगाव, जेऊर, धाराशिव आणि अकोला येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तापमानात घट झाल्याने झळा कमी झाल्या असल्या तरी उकाडा त्रासदायक ठरत आहे.
आज (ता. ५) महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज असून, दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्याच्या कमाल तापमानातील चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंत राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग)
कोकण : महाड २०, ठाणे २०.
मध्य महाराष्ट्र : जत ४०, पलूस १०, शिराळा १०, कवटेमहांकाळ १०, जावळी मेढा १०, पुणे शहर १०.
मराठवाडा : औसा ४०, निलंगा ४०, सोनपेठ ३०, शिरूर अनंतपाळ ३०, पूर्णा ३०, भूम २०, वाशी २०, उमरगा १०, धारूर १०, परभणी १०, जळकोट १०, वाडवणी १०, पाटोदा १०, देवणी १०.
शनिवारी (ता. ४) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
पुणे---३६.०---१८.४
अहिल्यानगर---निरंक---१८.५
धुळे---३८.०---१६.४
जळगाव---३७.०---२१.६
जेऊर---३७.५---१८.५
कोल्हापूर---३५.२---२१.७
महाबळेश्वर---२९.२---१४.५
मालेगाव---३७.८---२१.२
नाशिक---३६.०---१९.९
निफाड---३६.६---१७.०
सांगली---३४.७---२१.३
सातारा---३४.०---१८.६
सोलापूर---३८.५---२३.४
सांताक्रूझ---३४.५---२६.०
डहाणू---३६.५---२५.७
रत्नागिरी---३३.०---२४.१
छत्रपती संभाजीनगर---३५.७---१९.८
धाराशिव---३७.२---२१.०
परभणी---३८.२---२०.३
परभणी (कृषी)---३६.०---१९.८
अकोला---३७.१---२३.६
अमरावती---३४.४---२२.५
भंडारा---२५.०---२२.०
बुलडाणा---३४.३---२१.०
ब्रह्मपुरी---३१.५---२१.९
चंद्रपूर---३५.४---निरंक
गडचिरोली---३५.८---२०.०
गोंदिया---२७.५---१९.२
नागपूर---२६.६---२१.०
वर्धा---२९.०---२२.४
वाशीम---३५.६---निरंक
यवतमाळ---३२.४---२२.०
सरासरी तापमान (अंश से.)
विभाग---किमान---कमाल
विदर्भ---१९.२---३७.१
मराठवाडा---१९.८---३८.२
पश्चिम महाराष्ट्र---१४.५---३८.५
उत्तर महाराष्ट्र---१६.४---३८.०
कोकण---२४.१---३६.५
शनिवारी (ता. ५) राज्यातील पाऊस, उष्णेतेचा अंदाज दर्शवणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग) :
उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर.
३८ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :
सोलापूर ३८.५, परभणी ३८.२, धुळे ३८, मालेगाव ३७.८, जेऊर ३७.५, धाराशिव ३७.२, अकोला ३७.१, जळगाव ३७.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.