Monsoon Update : देशात सर्वदूर पोहोचला मॉन्सून

Monsoon 2023 Update : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) रविवारी (ता. २) देशात सर्वदूर पोहोचले आहे. यंदा सुरुवातीला वाट पाहायला लावणाऱ्या मॉन्सूनने यंदा सात दिवस उशिराने (८ जून) केरळमध्ये हजेरी लावली होती.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon
Published on
Updated on

Pune Rain News : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) रविवारी (ता. २) देशात सर्वदूर पोहोचले आहे. यंदा सुरुवातीला वाट पाहायला लावणाऱ्या मॉन्सूनने यंदा सात दिवस उशिराने (८ जून) केरळमध्ये हजेरी लावली होती. तर दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या (८ जूलै) सहा दिवस आधीच मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

Monsoon Update
Monsoon Update : कुठे दडला मॉन्सूनचा पाऊस?

अंदमान समुद्रात यंदा उशिराने १९ मे रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने ३० मे रोजी संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह व्यापला. त्यानंतर केरळमध्ये आगमन देखील लांबले. ८ जून रोजी केरळात डेरेदाखल झाल्यांनतर ११ जून रोजी मॉन्सूनने कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हजेरी लावली.

‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे तब्बल १२ दिवस पुढील वाटचाल थांबली होती. दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरील शाखा बळकट झाल्याने पूर्व भारतात मॉन्सूनची घोडदौड सुरू होती.

Monsoon Update
Monsoon 2023: माॅन्सून वाट अडखळलेलीच, राज्याच्या या भागांमध्ये आज पावसाचा अंदाज

२३ जून रोजी मॉन्सूनने पूर्व विदर्भात प्रगती केल्यानंतर २४ जून रोजी महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापला. २५ जूनला विक्रमी वेगाने प्रगती करत संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागात मॉन्सून वारे पोहोचले.

रविवारी (ता. २) मॉन्सूनने राजस्थान, हरियाना, पंजाबचा उर्वरित भागात मजल मारून संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. साधारणतः ८ जुलै रोजी देश व्यापणाऱ्या मॉन्सूनने ६ दिवस आधीच देशभरात मजल मारली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com