Maharashtra Rain Update : राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Maharashtra Monsoon 2023 Update : मॉन्सून कमजोर झाल्याने अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत.
Rain Update
Rain Update Agrowon

Pune Weather Update : मॉन्सून कमजोर झाल्याने अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज (ता. ६) उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. हवामान ढगाळ राहून, हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Rain Update
Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात जुलैमध्ये सरासरीच्या दीडपट पाऊस

मध्य प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्यालगत समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे सरकला आहे.

Rain Update
Maharashtra Rain Update : कोकण, पूर्व विदर्भात हलका, मध्यम पाऊस

मॉन्सूनचा आस पंजाबच्या भटिंडा पासून जिंद, मेरठ, हार्दोई कमी दाबाचे केंद्र, शांतीनिकेतन, मिझोराम पर्यंत विस्तारला आहे.

राज्याच्या काही भागात पावसाची उघडीप असून, ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळात हलक्या सरी पडत आहेत.

आज (ता. ६) कोकणातील पालघर, ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com