Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात जुलैमध्ये सरासरीच्या दीडपट पाऊस

Latest rain Update : चालू वर्षी ता. १ जूनपासून आत्तापर्यंत एकुण ५७६.९० मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस वार्षिक टक्केवारीच्या ६४.७३ टक्के नोंदला गेला आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात यंदा जूनमध्ये केवळ तीस टक्केच पाऊस झाल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे त्या जुलैमध्ये सरासरीच्या दीडपट पावसाची नोंद झाली आहे.

चालू वर्षी ता. १ जूनपासून आत्तापर्यंत एकुण ५७६.९० मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस वार्षिक टक्केवारीच्या ६४.७३ टक्के नोंदला गेला आहे. सध्या काही ठिकाणी पाऊस पडत आहे. पिकांच्या योग्य वाढीसाठी मात्र पावसाने उघडीप देणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात यंदाच्या वर्षी जून महिन्यात त्या महिन्याच्या सरासरी पैकी केवळ २९ टक्केच पावसाची नोंद झाली होती. या काळात कोरड्या दुष्काळाचे सावट होते. जुलै महिन्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

Rain Update
Maharashtra Rain Update : जुलैमध्ये पावसाची दमदार हजेरी

यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पूरस्थिती निर्माण होऊन जिल्हा ओल्या दुष्काळाच्या सावटात आला. जुलै महिन्यात सरासरीच्या जवळपास दीडपट पाऊस जास्त झाला. पावसाचे अजून ऑगस्ट, सष्टेंबर आणि ऑक्टोंबर असे तीन महिने शिल्लक आहेत. गेल्या दहा दिवसात अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले.

Rain Update
Pune Rain Update : पुणे दोन महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ७६ टक्के पाऊस

चालूवर्षी ता. १ जूनपासून आतापर्यंत एकूण ५७६.९० मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस वार्षिक टक्केवारीच्या ६४.७३ टक्के नोंदला गेला आहे. या जोरदार पावसामुळे सखल भागात आणि नदीकाठच्या जमिनीतील पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून शेतकऱ्यांनी सरसकट पंचनामे करून तत्काळ शासनाने मदत करावी, अशी मागणी केली आहे.

मंगळवारी सरासरी दहा मिलिमीटर पाऊस

मंगळवारी (ता. १ ऑगस्ट) सकाळी आठ वाजता संपलेल्या गेल्या २४ तासात सरासरी ९.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी संपलेल्या गत २४ तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे.

कंसातील आकडेवारी यंदाच्या वर्षी ता. १ जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची आहे. नांदेड - ७ (५२३.४०), बिलोली - २७ (७१८.२०), मुखेड - ११.४० (५५३.७०), कंधार - १७.७० (२९९.३०), लोहा - १५.९० (४२३.७०), हदगाव - ६.७० (५११.४०), भोकर - ६.६० (६३७.१०), देगलूर - १२ (५६६.७०), किनवट - २.८० (७७२.६०), मुदखेड - २.६० (५९६.७०), हिमायतनगर - १.७० (४८७.३०), माहूर - ५.८० (७८४.५०), धर्माबाद - १.५० (६६४.९०), उमरी - दोन (६३८.४०), अर्धापूर - ८.१० (६६२.८०), नायगाव - १५.१० (५२३.६०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com