Weather Update : पहाटे गारठा, दुपारी उन्हाच्या झळा

Weather News : कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाळ्याच्या झळा तापदायक ठरत आहे. तर किमान तापमानात मोठी घट झाल्याने पहाटेच्या वेळी गारठा अनुभवायला मिळत आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

Pune News : कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाळ्याच्या झळा तापदायक ठरत आहे. तर किमान तापमानात मोठी घट झाल्याने पहाटेच्या वेळी गारठा अनुभवायला मिळत आहे. मंगळवारी (ता. ५) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी ६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ६) राज्यात कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मागील महिन्याच्या शेवटच्या आठवाड्यात राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला. यातच दुपारच्या वेळी उन्हाचा चटका, उकाडा चांगलाच वाढल्याने घामटा निघाला. मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३४ अंशांच्या पार आहे.

Weather Update
Weather Update : राज्याच्या तापमानात चढ-उतार शक्य

दरम्यान निफाडपाठोपाठ धुळे येथील कृषी महाविद्यालयात ७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्याच्या इतर भागातही किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. मध्य प्रदेशापासून विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक ते उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून, आज (ता.६) चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Weather Update
Weather Update : कमाल तापमानात वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.६ (१३.४), धुळे ३०.० (७.४), जळगाव ३०.९ (११.८), कोल्हापूर ३४.० (१९.१), महाबळेश्वर २७.८ (१६.६), मालेगाव ३१.६ (१५.४), नाशिक ३०.५ (१०.८), निफाड ३०.० (६.६), सांगली ३४.५ (१७.९), सातारा ३५.० (१५.६), सोलापूर ३६.८ (१९.८), सांताक्रूझ २९.४ (१८.०), डहाणू २८.४ (१७.०), रत्नागिरी ३०.० (१९.७),

छत्रपती संभाजीनगर ३२.१ (१५.०), नांदेड ३४.० (१८.६), परभणी ३४.६ (१६.४), अकोला ३३.४ (१५.५), अमरावती ३३.४ (१७.९), बुलढाणा २९.७ (१५.६), ब्रह्मपूरी ३४.८ (१९.६) चंद्रपूर ३६.० (२०.०), गडचिरोली ३४.० (१७.८), गोंदिया ३१.८ (१६.८), नागपूर ३३.१ (१७.४), वर्धा ३५.० (१७.४), वाशीम ३४.६ (१४.६), यवतमाळ ३३.५ (१६.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com