Weather
WeatherAgrowon

Maharashtra Weather: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण हवामानाचा अंदाज

Heatwave Alert: राज्यात उन्हाचा चटका कायम असला, तरी कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. आज (ता. ३०) पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे.
Published on

Pune News: राज्यात उन्हाचा चटका कायम असला, तरी कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. आज (ता. ३०) पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैर्ऋत्य राजस्थानात तसेच वायव्य मध्य प्रदेशात परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते तमिळनाडूपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात उन्हाचा चटका कमी अधिक होत असून, उकाडा कायम आहे.

राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असून, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस, गारपीट झाली. गडचिरोली १५, गोंदियातील गोरेगाव १२.१, गोंदिया ६.२ मिलिमीटर पावासाची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या.

Weather
Maharashtra Paus Andaj: विदर्भातील २ जिल्ह्यांत गारपीटीचा अंदाज; मराठवाड्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

‎मंगळवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ‎‎अकोला ‎येथे राज्यतील उच्चांकी ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मालेगाव येथे ४३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. ‎यवतमाळ, ‎‎धुळे, ‎अमरावती, ‎परभणी, ‎छत्रपती संभाजीनगर, वर्धा, ‎वाशीम आणि ‎नागपूर येथे ४२ अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. ‎‎‎जळगाव, ‎जेऊर, सोलापूर, ‎धाराशिव, ‎‎बुलडाणा, ब्रह्मपुरी आणि ‎चंद्रपूर येथे ४१ अंशांपेक्षा अधिक, ‎निफाड, सातारा आणि ‎गडचिरोली येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले.

आज (ता. ३०) राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याचे संकेत आहेत. पुणे, सातारा, सोलापूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड येथे उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे. ‎तसेच नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश आणि कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Weather
Rain Alert: तापमानात घट; पूर्व विदर्भात पावसाचा इशारा

‎मंगळवारी (ता. २९) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---४०.८---२३.९

‎‎धुळे---४२.८---१९.४

‎जळगाव---४१.५---२६.३

‎जेऊर---४१.५---२३.०

‎कोल्हापूर---३८.३---२३.२

महाबळेश्‍वर---३३.३---२१.१

‎मालेगाव---४३.२---२४.८

‎नाशिक---३८.९---२२.५

‎निफाड---४०.५---२०.०

‎सांगली---३७.७---२३.५

‎सातारा---४०.७---२४.०

‎सोलापूर---४१.५---२८.२

‎सांताक्रूझ---३३.५---२५.३

अलिबाग---३५.८---२३.०

‎डहाणू---३५.१---२५.४

‎रत्नागिरी---३४.०---२५.२

‎छत्रपती संभाजीनगर---४२.४---२६.०

‎धाराशिव---४१.०---२३.४

‎परभणी---४२.६---२६.६

‎परभणी (कृषी)---४१.५---२३.४

‎अकोला---४४.५---२८.२

‎अमरावती---४२.८---२५.७

‎भंडारा---३८.६---२३.४

‎बुलडाणा---४१.०---२८.०

‎ब्रह्मपुरी---४१.७---२२.६

‎चंद्रपूर---४१.८---निरंक

‎गडचिरोली---४०.०---२३.६

‎गोंदिया---३८.०---२१.४

‎नागपूर---४२.३---२५.१

‎वर्धा---४२.४---२५.६

‎वाशीम---४२.४---निरंक

‎यवतमाळ---४२.९---निरंक

सरासरी तापमान (अंश से.)

‎विभाग---किमान---कमाल

‎विदर्भ---२१.४---४४.५

‎मराठवाडा---२३.४---४२.६

‎पश्‍चिम महाराष्ट्र---२१.१---४१.५

‎उत्तर महाराष्ट्र---१९.४---४३.२

‎कोकण---२३.०---३५.८

४३ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

‎अकोला ४४.५, ‎मालेगाव ४३.२.

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

पुणे, सातारा, सोलापूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड

वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com