Rain Alert
Rain AlertAgrowon

Maharashtra Paus Andaj: विदर्भातील २ जिल्ह्यांत गारपीटीचा अंदाज; मराठवाड्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

Vidarbha Hailstorm Alert: विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
Published on

Pune News: विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम राहील, असाही अंदाज देण्यात आला. 

विदर्भातील काही ठिकाणी पुढील ५ दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यातील काही ठिकाणी पुढील ५ दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

Rain Alert
Rain Alert: तापमानात घट; पूर्व विदर्भात पावसाचा इशारा

नागपूर, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज आहे. यवमाळ, अमरावती जिल्ह्यातही दोन दिवस आणि अकोला जिल्ह्यात एक दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. 

Rain Alert
Vidarbha Rain: विदर्भात ४ दिवस पावसाचा अंदाज; मराठवाड्यात उष्म आणि दमट हवामानाचा अंदाज

मराठवाड्यात तापमानात वाढ झाली असून काही ठिकाणी पावसाचीही शक्यता आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात दुपारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज तर सायंकाळी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही उन्हाचा पारा कायम राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com