
Agricultural Advice for Heatwaves in Maharashtra: तापमान वाढीसह ढगाळ हवामान राहील. रविवार ते मंगळवार (ता. २७ ते २९) या काळात कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, परभणी, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, जळगाव, जालना, लातूर, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहिल. पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात इक्वॅडोरजवळ २४ अंश सेल्सिअस, तर पेरूजवळ १६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. त्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव सुरूच राहील. याशिवाय बंगालच्या उपसागराच्या चेन्नईजवळील भागात पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके नोंदले आहे. त्यामुळे बाष्पीभवनाच्या वेगात वाढ होऊन यापुढे मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता कायम राहील.
कोकण
कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यांत कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ६१ ते ६३ टक्के, पालघर जिल्ह्यात ५३ टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ ३४ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत २ ते ४ किमी राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र
कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, धुळे जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर नंदूरबार जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, नंदूरबार जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, धुळे जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील.
मात्र जळगाव जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३५ ते ३९ टक्के आणि जळगाव जिल्ह्यात ८२ टक्के राहील. नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ टक्के, तर जळगाव जिल्ह्यात ४२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १३ किमी राहील. वाऱ्याची दिशा नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत नैऋत्येकडून, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.
मराठवाडा
धाराशिव, लातूर, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. तर नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे दुपारच्या वेळी उष्णतेच्या लाटा जाणवतील. हवामान अत्यंत कोरडे व उष्ण राहील. धाराशिव, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील.
तर लातूर, नांदेड व बीड जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३१ ते ३८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे सकाळी हवामान अत्यंत कोरडे राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जालना जिल्ह्यात ५१ टक्के, तर बीड जिल्ह्यात ६० टक्के आणि धाराशीव जिल्ह्यात ६५ टक्के राहील.
नांदेड, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते १९ टक्के राहील, तर लातूर व जालना जिल्ह्यांत २१ ते २२ टक्के राहील. परभणी व धाराशीव जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग लातूर, हिंगोली, परभणी, बीड, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांत ४ ते ८ कि.मी., तर जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ
कमाल तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस आणि अकोला जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील.
सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २१ ते २३ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यात २९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे सकाळी हवामान कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ८ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १३ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मध्य विदर्भ
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २१ ते २७ टक्के आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते ८ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग यवतमाळ जिल्ह्यात ७ कि.मी., तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ताशी ६ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
कमाल तापमान गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३१ ते ३७ टक्के आणि गडचिरोली जिल्ह्यात ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते ११ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ९ कि.मी., तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ताशी ११ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र
सोलापूर जिल्ह्यात आज (ता.२७) २ मिमी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, तर सांगली व सातारा जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. अहिल्यानगर जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात ते ४३ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान सातारा जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. तर सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ४३ ते ४८ टक्के, तर सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ६८ टक्के राहील.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत २३ टक्के, तर सातारा जिल्ह्यात केवळ १९ टक्के इतकी कमी राहील. सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ४० टक्के इतकी राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील.
कृषी सल्ला
फळबागांमध्ये सेंद्रिय आच्छादन करावे. ठिबक सिंचनाचा कालावधी वाढवावा.
भाजीपाला पिकांमध्ये सिंचनाचे काटेकोर नियोजन करावे.
केळी बागेचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बागेभोवती हिरवे शेडनेट लावावे.
जनावरांना दिवसातून किमान ४ वेळा पिण्यासाठी शुद्ध पाणी द्यावे.
उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.