IMD Rain Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज

Rain Forecast : राज्यात पाऊस ओसरला असला, तरी घाटमाथ्यासह तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळत आहेत.
Monsoon
Monsoon Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात पाऊस ओसरला असला, तरी घाटमाथ्यासह तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळत आहेत. आज (ता. १०) कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

झारखंड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर, तर ईशान्य राजस्थान आणि परिसरावर ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या बिकानेर, शिवपुरी, सिधी, दौलतगंज, दिघा ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर कर्नाटकपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

Monsoon
Monsoon Rain : जळगाव जामोद, शेगाव तालुक्यात यंदा पाऊस जोरावर

शुक्रवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला. तर विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी पडल्या. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. घाटमाथ्यावरील दावडी येथे उच्चांकी ८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

Monsoon
Maharashtra Rain Update : राज्यातील १७ जिल्ह्यात येलो अलर्ट; विदर्भात पावसाचा जोर वाढणार 

आज (ता. १०) कोकणातील रायगड जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्याचा घाटमाथा, पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा ‘येलो अलर्ट’ आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरींची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, पुणे, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

वर्धा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com