Weather Update : राज्यात ऊन, उकाडा वाढला

Summer Heat : राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असतानाच उकाडा वाढला आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत.
Summer Heat
Summer HeatAgrowon

Pune News : राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असतानाच उकाडा वाढला आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. आज (ता. २६) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Summer Heat
Maharashtra Rain : आजही काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज; मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज कायम 

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र परिसरावर, तसेच उत्तर कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. मराठवाड्यापासून उत्तर तमिळनाडूपर्यंत तसेच, मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकपर्यंत हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत. यामुळे ढगाळ आकाशासह राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे.

Summer Heat
Weather Update : कडक उन्हासह आजही वादळी पावसाचा इशारा

गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव, धुळे येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले.

गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.५, धुळे ४२, जळगाव ४१.७, कोल्हापूर ३७.८, महाबळेश्वर ३१.८, मालेगाव ४२, नाशिक ३८.७, निफाड ३७.७, सांगली ३९.१, सातारा ३८.२, सोलापूर ४१.२, सांताक्रूझ ३४.२, डहाणू ३३.७, रत्नागिरी ३३.४, छत्रपती संभाजीनगर ३८.६, बीड ४०.१, परभणी ३८.५, अकोला ४०.४, अमरावती ४०.०, बुलडाणा ३७.६, ब्रह्मपुरी ४०.५, चंद्रपूर ३९.६, गडचिरोली ३८.४.

४० अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे : धुळे ४२, मालेगाव ४२, जळगाव ४१.७, सोलापूर ४१.२, वाशीम ४०.६, ब्रह्मपुरी ४०.५, अकोला ४०.४, बीड ४०.१, वर्धा ४०.१, अमरावती ४०.

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com