Weather Update : कडक उन्हासह आजही वादळी पावसाचा इशारा

Weather Forecast : कोकणात उन्हाचा ताप वाढल्याने चांगलाच घामटा निघत आहे. यातच राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाने तडाखा दिला आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

Pune News : कोकणात उन्हाचा ताप वाढल्याने चांगलाच घामटा निघत आहे. यातच राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाने तडाखा दिला आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. आज (ता. २५) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

Weather Update
Weather Forecast : मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा

मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान होत असून, मंगळवारी (ता. २३) नांदेड, परभणी, जालना, अमरावती, वर्धा जिल्ह्यांत वादळी पावसाने तडाखा दिला. आज (ता. २५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानात चढ-उतार होत असून, धुळे, जळगाव, ब्रह्मपुरी येथे तापमान ४० अंशांवर आहे. आज (ता. २५) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.

Weather Update
Maharashtra Rain : राज्यात १० जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता; अनेक भागात वादळी पावसाचा अंदाज

बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.६, धुळे ४१, जळगाव ४०.८, महाबळेश्वर ३२.४, मालेगाव ४१.८, नाशिक ३८.२, निफाड ३८.१, सांगली ३८.२, सातारा ३८.४, सोलापूर ३९.८, सांताक्रूझ ३४.२, डहाणू ३४.५, रत्नागिरी ३४.६, छत्रपती संभाजीनगर ३८.२, बीड ३७.९, धाराशिव ३८.९, परभणी ३९.१, अकोला ३९.२, अमरावती ३७.८, बुलडाणा ३७.६, ब्रह्मपुरी ४०.८, चंद्रपूर ३९, गडचिरोली ३६.६, गोंदिया ३६, नागपूर ३७.८, वर्धा ३९, वाशीम ३८.६, यवतमाळ ३८.५.

४० अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे : मालेगाव ४१.८, धुळे ४१, जळगाव ४०.८, ब्रह्मपुरी ४०.८.

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : जळगाव, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com