Weather Forecast : विदर्भ, मराठवाड्यात पाऊस, गारपिटीचा इशारा कायम

Rain Update : विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा सुरूच आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

Pune News : विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा सुरूच आहे. उन्हाची ताप वाढल्याने उकाडा त्रासदायक ठरत आहे. आज (ता. १९) विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीचा इशारा कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

विदर्भ आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण तमिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे रविवारी (ता. १७) विदर्भ, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह वादळी पाऊस गारपिटीने हजेरी लावली आहे.

आज (ता. १९) पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

Rain Update
Weather Update : पूर्व विदर्भात आज गारपिटीचा इशारा

सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वाशीम येथे पारा ३९ अंशांपार कायम असून, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम असला तरी तापमानात चढ-उतार सुरूच आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाची ताप कायम राहण्याची शक्यता आहे.

Rain Update
Weekly Weather : मध्य विदर्भात अल्पशा पावसाची शक्यता

सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.०, धुळे ३६.०, जळगाव ३७.७, कोल्हापूर ३६.२, महाबळेश्वर ३०.४, नाशिक ३४.८, निफाड ३६.०, सांगली ३६.९, सातारा ३६.६, सोलापूर ३९.८, सांताक्रूझ ३२.५, डहाणू ३१.३, रत्नागिरी ३१.३,

छत्रपती संभाजीनगर ३६.२, नांदेड ३६.६, परभणी ३६.९, अकोला ३७.९, अमरावती ३७.६, बुलडाणा ३६.४, ब्रह्मपुरी ३९.०, चंद्रपूर ३७.२, गडचिरोली ३६.०, गोंदिया ३५.०, नागपूर ३६.२, वर्धा ३७.०, वाशीम ३९.०, यवतमाळ ३७.७.

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.

वादळी पावसाचा गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, नांदेड, लातूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com