Carbon Credit : हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी कार्बन क्रेडीट

Greenhouse Gas Emissions : येत्या काळात कार्बन क्रेडीट हा जागतिक पातळीवरील महत्त्वाचा विषय आहे. अनेक देश हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी कार्बन क्रेडीट वापरत आहेत.
Salam Kisan
Salam KisanAgrowon
Published on
Updated on

Green House Effect : येत्या काळात कार्बन क्रेडीट हा जागतिक पातळीवरील महत्त्वाचा विषय आहे. अनेक देश हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी कार्बन क्रेडीट वापरत आहेत. हे कार्बन क्रेडीट नेमक काय आहे. तर वृक्षतोड आणि प्रदुषणामुळे पृथ्वीवरिल कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढीला सामोर जाव लागत आहे.  पृथ्वीभोवती विविध वायूंचे अवरण असते. या अवरणामुळे सूर्यप्रकाशातील उष्णता शोषली किंवा परावर्तीत होते. त्यामुळे सजीवाला हानिकारक असलेली किरणे रोखली जातात. जर या वायुचे अवरण पृथ्वीभोवती नसते तर पृथ्वीचे तापमान वाढून सजीवाला पृथ्वीवर राहण अवघड झालं असत. हे वायुंच अवरण हरितगृहावर ज्याप्रमाणे काचेच किंवा प्लॅस्टिकच अवरण असत त्याप्रमाणेच काम करत त्यामुळे या परिणामाला हरितगृह परिणाम असे म्हणतात. वातावरणातील हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतीक स्तरावर कार्बन क्रेडिट ही संकल्पना उदयास आली.    

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी, पुढील पिढीला शुद्ध हवा, शुद्ध पाणी मिळण्यासाठी ‘कार्बन क्रेडीट’आवश्यक आहे. जगभरातील एकूण कार्बन डाय ऑक्साइड आणि हरितगृह वायूचे व्यवस्थापन आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर  २१ मार्च १९९४ ला १९७ देश एकत्र आले.  या देशांनी मिळून आंतरराष्ट्रीय पातळीवर UNFCCC (United Nations Framework Convention on Climate Change) नावाची संस्था स्थापन केली. UNFCCC ने प्रत्येक देशासाठी कार्बन उत्सर्जनाची सीमा ठरवून दिली आहे. १९९७ साली क्योटो जपानमध्ये 'क्योटो प्रोटोकॉल' हा आंतरराष्ट्रीय करार झाला. त्यातून 'कार्बन क्रेडिट ट्रेडिंग (व्यापार)' ही नवीन संकल्पना जन्माला आली. त्यानंतर २०१५ मध्ये १९५ देशांनी सहभाग घेऊन ‘पॅरिस पर्यावरण करार’ केला. क्योटो करारानुसार जागतिक पातळीवर कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी  विकसित देशातील कंपन्या कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी जास्त आर्थिक गुंतवणूक करून आधुनिक तंत्रज्ञान विकसित करू शकतात. उदाहरणार्थ - ऑटोमोबाईल उद्योगाला ‘इ’ कारचा पर्याय देऊन तंत्रज्ञान विकसित करणे.  विकसित देशांतील कंपन्या कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करू शकत नसल्यास ‘क्योटो करारानुसार ते भारतासारख्या देशांकडून कार्बन क्रेडिट खरेदी करू शकतात.  

Salam Kisan
हरितगृहांतील वायू उत्सर्जन कमी करण्याची गरज

क्योटो प्रोटोकॉलप्रमाणे  कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, हायड्रोफ्लुरोकार्बन, पेरफ्लुरोकार्बन आणि सल्फर हेक्साफ्लुरॉईड हे मुख्य सहा हरितगृह वायू आहेत.  त्यातील तीन वायूचे प्रमाण हे  मानसाच्या कार्यपद्धतीमुळे वाढत आहे. जे  जास्त उष्णता रोखत आहेत. त्याचा परिणाम नैसर्गिक हरितगृह परिणामांवर होत आहे.  त्यामुळे जागतिक तापमानामध्ये वाढ होत असल्याने जागतिक काळजीचे विषय बनले आहेत. 

औद्योगिक तसेच शेती क्षेत्रातील जे कोणी कमी कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन करेल, त्यांना UNFCCC च्या नियमावलीनुसार पॉइंट्स वाढवून मिळू शकतात. असे घटक हे आपल्या जवळचे वाढीव पॉइंट्स ‘जास्त’ कार्बन उत्सर्जन करणाऱ्यांना विकू शकतात. कार्बन क्रेडिट कमावण्यासाठी औद्योगिक क्षेत्राला प्रगत तंत्रज्ञान वापरून हरितगृह वायूंची निर्मिती कमी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.  जाणकारांच्या मते उपलब्ध क्षेत्रापैकी एक लाख हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण केल्यास वातावरणातील १० लाख टन कार्बन डायऑक्साइड वायू शोषला जाऊ शकतो.

----------

माहिती आणि संशोधन - डॉ. हेमंत बेडेकर 

(An initiative by Salam Kisan.)

(सलाम किसान हे सुपर अॅप असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सेवा व उत्पादने उपलब्ध करून दिली जातात.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com