Food Waste Construction: टाकाऊ अन्नपदार्थांपासून मजबूत बांधकाम : आयआयटी इंदूरच्या संशोधकांचा नवा शोध

IIT Indore Research: टाकाऊ अन्नपदार्थांपासून सिमेंट काँक्रीट मजबूत करता येईल का? आयआयटी इंदूरच्या संशोधकांनी या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असे दिले आहे. त्यांच्या नव्या संशोधनानुसार, घरगुती टाकाऊ अन्नपदार्थ आणि जिवाणूंच्या मिश्रणाने काँक्रीटच्या मजबुतीत वाढ होते आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होतो.
Food Waste
Food WasteAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture: अनेकदा शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ टाकून दिले जातात. मात्र इमारतीच्या बांधकामात अशा अन्नपदार्थांचा वापर करून बांधकामाची मजबुती वाढविण्याचा अनोखा पर्याय आयआयटी इंदूरच्या संशोधकांनी शोधला आहे. बांधकामाच्या काँक्रिटमध्ये टाकाऊ अन्नपदार्थ रोगकारक नसलेल्या जिवाणूंसह मिसळल्यास बांधकामाची मजबुती वाढते आणि कार्बन उत्सर्जनही कमी होते, असा दावा संशोधकांनी केला आहे.

संशोधक व आयआयटीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक संदीप चौधरी पीटीआयशी बोलताना म्हणाले, ‘‘अन्नपदार्थ कुजतात तेव्हा त्यातून कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन होते. काँक्रीटमध्ये जिवाणू आणि टाकाऊ अन्नपदार्थ मिसळले जातात तेव्हा काँक्रीटमध्ये अस्तित्वात असलेल्या कॅल्शिअमच्या आयनशी कार्बन डायऑक्साइडची प्रक्रिया होऊन कॅल्शिअम कार्बोनेट स्फटिकांची (क्रिस्टल) निर्मिती होते. हे स्फटिक काँक्रीटमधील छिद्रे आणि भेगा भरतात. या प्रक्रियेतून काँक्रीट वजनावर कोणताही विशेष परिणाम न होता अधिक मजबूत किंवा घन बनते,’’ असेही त्यांनी सांगितले.

Food Waste
Waste Management: गुंतागुंत: कचऱ्याची आणि आपल्या जगण्याची!

ते म्हणाले, ‘‘आम्ही कुजलेल्या फळांचा पल्प आणि सालांमधील रोगजनक नसलेले जिवाणू (ई कोलायच्या प्रजातीचे) बांधकामाच्या काँक्रिटमध्ये मिसळले. त्यामुळे काँक्रीटची क्षमता दुप्पट झाली. या जिवाणूचे वैशिष्ट्य म्हणजे काँक्रीटमधील छिद्रे आणि भेगा भरल्याबरोबर त्याची वाढ थांबते. त्यामुळे बांधकामाचे नंतर कोणतेही नुकसान होत नाही. आम्ही आमच्या संशोधनात कोबीचे देठ, बटाट्याची साल, मेथीचे देठ, संत्र्याच्या सालीसारख्या घरगुती टाकाऊ अन्नपदार्थांवर लक्ष्य केंद्रित केले,’’ असेही ते म्हणाले.

(पीटीआय)

Food Waste
Agriculture Technology : नवी पीकपद्धती, तंत्रज्ञान वापरातून ‘देगाव’ची वाटचाल

कसा केला वापर?

टाकाऊ अन्नपदार्थांतील उपलब्ध पाण्याच्या प्रमाणानुसार काँक्रीटचा वापर निश्चित करण्यात आला. त्याचप्रमाणे, कमी आर्द्रता असलेल्या अन्नपदार्थांचा पावडरीसारखा उपयोग करण्यात आला. ते पाण्याबरोबर मिसळून एकसमान द्रव तयार करण्यात आले. अधिक आर्द्रता असलेल्या टाकाऊ अन्नपदार्थांचा पल्प म्हणून वापर करून द्रव तयार करून वापर करण्यात आला.

काँक्रीटमध्ये जिवाणू मिसळण्याच्या जुन्या पद्धतीत कृत्रिम रसायनांचा वापर केल्याने ही प्रक्रिया महागडी आणि कमी टिकाऊ बनली होती. मात्र आयआयटी इंदूरच्या संशोधकांनी या प्रक्रियेचा खर्च कमी करण्यासाठी कृत्रिम रसायनांऐवजी टाकाऊ अन्नपदार्थांचा वापर केला. हे अन्नपदार्थ पाण्यात जीवाणूसह सहजपणे विरघळून सहजपणे काँक्रीटमध्ये मिसळतात.
प्रा. हेमचंद्र झा, संशोधक, आयआयटी इंदूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com