Canal Leakage : शहानूर कालव्यांना सिमेंट काँक्रीटचा लेप

Canal Repairing Work : शहानूर कालव्यांची क्षतिग्रस्त स्थिती पाहता पाटबंधारे विभागाकडून साधारणतः पस्तीस वर्षांनंतर शहानूर कालव्यांच्या सर्वेक्षणाच्या कामाला ऑगस्ट २०२४ मध्ये सुरुवात केली होती.
Water Canal
Water Canal Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : शहानूर कालव्यांची क्षतिग्रस्त स्थिती पाहता पाटबंधारे विभागाकडून साधारणतः पस्तीस वर्षांनंतर शहानूर कालव्यांच्या सर्वेक्षणाच्या कामाला ऑगस्ट २०२४ मध्ये सुरुवात केली होती. सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याने आता सदरच्या कालव्यांना सिमेंट काँक्रिटचा लेप देऊन ते चकाचक करण्याचा मुहूर्त लाभला आहे.

कोथरूड जिल्हा परिषद सर्कलअंतर्गत येणाऱ्या वाघडू गावाजवळ १९९० च्या कालावधीदरम्यान शहानूर प्रकल्पाची निर्मिती झाल्यानंतर उजवा व डावा कालव्यातून दर वर्षीच्या मागणीनुसार पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांना शेतीच्या शेवटच्या टोकापर्यंत सिंचनासाठी पाणीपुरवठा होतो.

Water Canal
Water Canal Management : चार कोटी मंजुरीनंतरही अंजना-पळशी कालवा दुरुस्तीचे काम रखडले

शहानूर प्रकल्पाच्या निर्मितीच्या वेळी पाटबंधारे विभागाजवळ कालव्यासंदर्भात जे डायग्राम तपशील होते, त्यापैकी काही पूर्णतः जीर्णावस्थेत गेले असून इतर कारणांनी ते नष्ट झाले आहेत. अशा वेळी कालव्यांच्या माहितीसाठी सदस्य तपशील अपडेट करणे जरुरीचे झाले आहे, म्हणूनच कालव्यांच्या लेव्हलचे सर्वे करण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले होते.

एकदा सर्वे पूर्ण झाला की मागणीनुसार उपलब्ध झालेल्या निधीतून सदर कालव्याचे काँक्रिटीकरण करण्यात येईल किंवा उपलब्ध होणाऱ्या निधीतून किमान लेवल घेणे, कालवा कुठे खाली गेला आहे, कुठे दबला आहे का हे पाहिले जाणार आहे.

Water Canal
Canal Leakage : कालव्याच्या गळतीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका; पिकांचे नुकसान

दोन्ही बाजूने मुरूम टाकणे, कालव्यांची साफसफाई करणे, कालव्याच्या ज्या भागातून पाणी वाहत असेल ते बंद करणे, तुटलेल्या ठिकाणाचे कालवे दुरुस्त करणे ही कामे सर्वेक्षण पूर्ण होताच सुरू होणार असल्याचे सुद्धा अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या पथ्रोट मायनरवर बांधकाम सुरू झाले आहे. कालव्यांची क्लिनिंग करणे, सिमेंट काँक्रिटची लेव्हल करणे, खराब झालेले पॅचेस भरणे आधी कामे सुरू आहेत. सध्या पाण्याचे रोटेशन सुरू होणार आहे. त्यामध्ये मिळणाऱ्या वेळेत सदरच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. सध्या डाव्या कालव्यावर ४०० मीटरचे सिमेंट काँक्रिटचे बांधकाम पूर्ण होणार आहे.
-शुभम चव्हाण, शाखा अभियंता, शहानूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com