
2025 Tractor Market : देशातच्या पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागात पाणीसाठा मागील १० वर्षाच्या सरासरीत वाढ झाली आहे. तसेच रब्बी हंगामापासून ला निनाला अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने देशांतर्गत विक्रीला गती मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. २०२५ या आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीच्या सुरुवातीला देशातील ट्रॅक्टर विक्री मागील वर्ष आणि महिन्याच्या तुलेनेत जानेवारीत वाढली आहे.
तर निर्यात मात्र मागील वर्षात वाढली असून जानेवारी महिन्यात घटली आहे. देशातंर्गत ट्रॅक्टरची विक्री जानेवारी २०२५ मध्ये ६१ हजार ९२३ वर पोहचली आहे. तर मागील वर्षी जानेवारी मात्र ५५ हजार ५८९ ट्रॅक्टरची विक्री झाली होती. म्हणजेच ट्रॅक्टर अँड मॅकेनायझेशन असोशिएशनच्या आकडेवारीनुसार मागील वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत यंदा ११ टक्के वाढ झाली आहे. तर २०२४ डिसेंबरच्या तुलेनेत २१ टक्के वाढ जानेवारी २०२५ मध्ये पाहायला मिळत आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीचं उत्पादन १५ टक्क्यांनी वाढलं आहे. जानेवारी २०२४ मध्ये २२ हजार ९७२ ट्रॅक्टरची विक्री केली होती. यंदाच्या जानेवारी महिन्यातील महिंद्रा ट्रॅक्टरची विक्री २६ हजार ३०५ ट्रॅक्टरवर पोहचली आहे.
तसेच सोनालिका ट्रॅक्टरची देशांतर्गत ट्रॅक्टर विक्री १२ टक्के वाढली आहे. जानेवारी २०२४ मध्ये ७ हजार १५८ ट्रॅक्टर विक्रीवरून जानेवारी २०२५ मध्ये ट्रॅक्टरची विक्री ८ हजार २७ वर पोहचली आहे.
देशात मागील तीन महिन्यात जानेवारी २०२५ मध्ये ट्रॅक्टर उत्पादन ९२ हजार ७६८ ट्रॅक्टरवर पोहचलं आहे. जानेवारी २०२४ मध्ये ७४ हजार ८९५ ट्रॅक्टरचं उत्पादन देशात झालं होतं. तर कुबोटाची मात्र देशांतर्गत ट्रॅक्टर विक्री ११ टक्क्यांनी घटली आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात कुबोटाचे ६ हजार ७८२ ट्रॅक्टर विक्री झाली होती. यंदा मात्र ६ हजार ५८ वरच कुबोटाची ट्रॅक्टर विक्री रखडली आहे.
२०२५ च्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत ट्रॅक्टर उद्योगाला उच्चांकी १४ टक्के वाढ तर २०२४ च्या ९ महिन्यांच्या तुलेनेत ५ टक्के वाढ नोंदवली आहे. दुसऱ्या सहामाहित देशात मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे ट्रॅक्टर उत्पादनाला गती मिळाली, असं जाणकार सांगतात.
"नैऋत्य मॉन्सूनच्या तुलनेत जमिनीतील ओलावा वाढला आहे. त्यामुळे जलशयातील पाणी साठयाची पातळी चांगली आहे. परिणामी रब्बीत पेरणी क्षेत्र वाढलं. केंद्र सरकारने योजनांद्वारे पाठबळ मिळाल्याने पुढील काळातही ट्रॅक्टरच्या मागणीत सकारात्मक संकेत मिळत आहे," असं बिझनेस लाईन या वृत्तपत्राशी बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे शेती उपकरण विभागाचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले.
ट्रॅक्टरची निर्यात मागील जानेवारीच्या तुलनेत मात्र काहीशी वाढली आहे. जानेवारीमध्ये ट्रॅक्टरची निर्यात ७ हजार ८४७ वर पोहचली. परंतु जानेवारी २०२४ च्या डिसेंबरच्या तुलनेत थोडी कमी आहे. डिसेंबर २०२४ मध्ये ट्रॅक्टर निर्यात ८ हजार ७४ वर होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.