Tractor Sales : देशातील ट्रॅक्टर विक्रीत वाढ; उत्पादन मात्र घटलं

Tractor Market : २०२४ च्या पहिल्या पाच महिन्यात ट्रॅक्टरची विक्री मंदावली होती. परंतु नंतरच्या काळात मात्र त्यामध्ये काहीशी सुधारणा दिसली. कारण यंदा मॉन्सून हंगामात चांगला पाऊस झाला. परंतु प्रमुख शेतीमालाच्या खालीच राहिल्याने शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर खरेदीला पसंती देण्यात आली नाही
Tractor Sales
Tractor SalesAgrowon
Published on
Updated on

देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीत २०२४ मध्ये काहीशी घट झाली असून ट्रॅक्टरच्या निर्यातीत मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. मात्र ट्रॅक्टर उत्पादन सलग दुसऱ्या वर्षातही दहा लाखांच्या खालीच राहिलं आहे. ट्रॅक्टर अँड मॅकेनायझेशन असोशिएशनच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये मात्र ट्रॅक्टरची विक्री ९.१५ लाखांवर होती. तर २०२४ मध्ये ट्रॅक्टरची विक्री ९.०२ लाख युनिटवर थांबली.

२०२४ च्या पहिल्या पाच महिन्यात ट्रॅक्टरची विक्री मंदावली होती. परंतु नंतरच्या काळात मात्र त्यामध्ये काहीशी सुधारणा दिसली. कारण यंदा मॉन्सून हंगामात चांगला पाऊस झाला. परंतु प्रमुख शेतीमालाच्या खालीच राहिल्याने शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर खरेदीला पसंती देण्यात आली नाही. दसरा आणि दिवाळीच्या काळात ट्रॅक्टर विक्रीत काही प्रमाणात तेजी आली होती.

Tractor Sales
Tractor Servicing : ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग घरी करणं योग्य?

देशातील ट्रॅक्टर विक्री २०२४ च्या डिसेंबरमध्ये काही प्रमाणात वाढली होती. कारण खरीपात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी उत्साह दाखवला होता. त्यामुळे देशातील ट्रॅक्टरच्या मागणीत काहीशी वाढ झाली. परंतु ही व वाढ टिकली नाही.

देशातील ट्रॅक्टरचं उत्पादन २०२४ मध्ये काहीसं घटलं आहे. देशात २०२३ मध्ये ९.८६ लाख ट्रॅक्टरची निर्मिती करण्यात आली होती. २०२४ मध्ये मात्र ९.८२ लाख ट्रॅक्टरची निर्मिती करण्यात आली. २०२२ आणि २०२१ साली देशातील ट्रॅक्टर निर्मितीनं सलग दोन वर्ष १० लाखांचा टप्पा ओलांडला होता. परंतु २०२३ आणि २०२४ मध्ये मात्र दुष्काळाच्या झळा आणि शेतीमालाचे पडलेली भाव या दोन कारणाने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदीसाठी उत्साह दाखवला नाही.

देशातून ट्रॅक्टरची निर्यात मात्र पूर्वपदावर पोहचली आहे. भारतीय बनावटीच्या ट्रॅक्टर निर्यात संख्येत वाढ झाली आहे. २०२२ मध्ये भारतीय बनावटीच्या ट्रॅक्टरची निर्यात १ लाख ३१ हजार ८५० वर पोहचली होती. मात्र २०२३ मध्ये ९६ हजार २२३ ट्रॅक्टर निर्यात घसरली. तर २०२४ मध्ये मात्र ९७ हजार ७४५ भारतीय बनावट ट्रॅक्टरची निर्यात करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com