Renewable Energy: सौरऊर्जाचलित भुईमूग डिकॉर्टिकेटर

Groundnut Decorticator: भुईमुगाच्या शेंगा फोडण्याची पारंपरिक प्रक्रिया खर्चीक आणि वेळखाऊ आहे. तसेच ज्यामुळे उत्पादकता कमी होते, काढणीनंतरचे नुकसान वाढते. सौरऊर्जाचलित भुईमूग डिकॉर्टिकेटर हे शेंगा फोडणी यंत्र आहे.
Groundnut Decorticator
Groundnut DecorticatorAgrowon
Published on
Updated on

सुजित यमगर, नव्या के.

Agriculture, Sustainability: भुईमुगाच्या शेंगा फोडण्याची पारंपरिक प्रक्रिया खर्चीक आणि वेळखाऊ आहे. तसेच ज्यामुळे उत्पादकता कमी होते, काढणीनंतरचे नुकसान वाढते. सौरऊर्जाचलित भुईमूग डिकॉर्टिकेटर हे शेंगा फोडणी यंत्र आहे. सौरऊर्जा वापरून प्रक्रिया अधिक कार्यक्षम, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक बनते.

यंत्राचे कार्य

कामगिरी चाचणी गती : यंत्राची चाचणी १००, २०० आणि ३०० आरपीएम या गतीवर घेण्यात आली.

सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता : २०० आरपीएम गतीवर ९३.७५ टक्के कार्यक्षमता नोंदवली गेली, ही सर्वोत्तम ठरली आहे.

Groundnut Decorticator
Solar Project : शिंदखेड्यातील शेतकऱ्यांचा सौर प्रकल्पाला विरोध

इतर गतींची कार्यक्षमता

१०० आरपीएम................८५ टक्के

३०० आरपीएम................९५ टक्के

तुटलेले दाणे

२०० आरपीएम गतीवर सर्वांत कमी आहे.

टरफल काढण्याची क्षमता

२०० आरपीएमवर संतुलित आहे.

उगवण्याचे प्रमाण

२०० आरपीएम वर सर्वाधिक आहे. बियाणे प्रक्रियेसाठी योग्य आहे.

टरफल न निघालेल्या दाण्यांचे प्रमाण

२०० आरपीएम वर सर्वाधिक कमी आहे.

या सौरऊर्जाचलित भुईमूग डिकोर्टिकेटरचे मूल्यांकन कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी नव्या के., अमरनाथ आय., रेगन आणि दीपक एम. एस. हे करत आहे.

Groundnut Decorticator
Ministry of Non-Conventional Energy : केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदी निधी खरे यांची नियुक्ती

निष्कर्ष

सौरऊर्जाचालित भुईमूग डिकॉर्टिकेटरने २०० आरपीएम गतीवर सर्वोत्तम कार्यक्षमता दाखवली, ज्यामध्ये ९३.७५ टक्के डिकॉर्टिकेशन कार्यक्षमता प्राप्त झाली, ज्यामुळे उच्च गुणवत्ता, कमी दाण्यांचे नुकसान झाले.

यंत्राचा तपशील घटक तपशील

मुख्य फ्रेम ५१० मिमी × २५० मिमी × ५ मिमी

सौर पॅनेल क्षमता २०० वॉट

बीएलडीसी मोटर १.२ एचपी

मोटर ३५०० आरपीएम

दोन लेड ॲसिड बॅटरी १२ व्होल्ट, ८ ॲम्पिअर

सिलिंडर शाफ्टचा व्यास २५ मिमी

हॉपर ४५० मिमी × २२० मिमी × १०० मिमी

सुजित यमगर ९७३०७६४४७७

(कृषी उपकरणे आणि ऊर्जा विभाग, भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com