Groundnut Procurement : भुईमूग शेंगांची ५.४ लाख टन हमीभावाने खरेदी

Groundnut Market Update : केंद्र सरकारने देशभरात यंदाच्या खरिपातील सुमारे ५ लाख ४ हजार ३९० टन भुईमूग शेंगांची खरेदी हमीभावाने केली आहे. यंदाच्या हंगामात सुमारे ६७८३ रुपये असा हमीभाव भुईमुगाला जाहीर करण्यात आला आहे.
Groundnut
GroundnutAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : केंद्र सरकारने देशभरात यंदाच्या खरिपातील सुमारे ५ लाख ४ हजार ३९० टन भुईमूग शेंगांची खरेदी हमीभावाने केली आहे. यंदाच्या हंगामात सुमारे ६७८३ रुपये असा हमीभाव भुईमुगाला जाहीर करण्यात आला आहे. त्याच वेळी छत्तीसगडसह देशाच्या अनेक राज्यांमध्ये भुईमुगाचे दर मात्र ५५०० रुपयांवर स्थिरावले होते.

खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा अवस्थेत खरिपातील लागवड आणि उत्पादकता ही सर्वाधिक म्हणून तीनही हंगामांच्या तुलनेत ९० टक्‍के राहते. त्यामुळेच या हंगामावरच शेतकऱ्यांची सर्वाधिक भिस्त राहते, असा दावा केला जात आहे. डिसेंबर अखेरपर्यंत छत्तीसगडच्या बाजारात भुईमूग शेंगांची आवक होत होती.

Groundnut
Summer Groundnut Cultivation : सुधारित पद्धतीने उन्हाळी भुईमूग लागवड

याला सरासरी ५५०० रुपयांचा दर मिळाला. या व्यवहारातही शेतकऱ्यांना नुकसानच सोसावे लागले आहे. हमीभावाच्या तुलनेत सरासरी एक हजार रुपयांची तुट शेतकऱ्यांना सोसावी लागली. छत्तीसगड राज्यात जुलै २०२४ मध्ये ४९०० ते ५००० रुपयांचा दर होता. जुलैअखेर याच राज्यात भुईमुगाचे दर ६३०० रुपयांवर देखील पोहोचले होते. त्या वेळी आवक अवघी ११ क्‍विंटल इतकी होती.

रायपूर, दुर्ग बाजार समितीत छत्तीसगड राज्याबाहेरून आवक झालेल्या भुईमुगाला ७००० ते ११००० रुपयांचा दर ऑगस्ट महिन्यात मिळाला. त्या वेळी आवक अवघी २० क्‍विंटल इतकी नोंदविली गेली. ऑक्टोबरपासून खरिपातील भुईमुगाची स्थानिक स्तरावर आवक होण्यास सुरुवात झाल्यानंतर दर पुन्हा दबावात आले. ४००० ते ६००० रुपयांपर्यंतची तेजी नोव्हेंबर २०२४ या महिन्यात नोंदविण्यात आली.

Groundnut
Groundnut Cultivation : उन्हाळी भुईमूग लागवड तंत्र

कारंजा बाजारात सर्वाधिक आवक

पश्‍चिम विदर्भातील यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये भुईमूग शेंग उत्पादकांची संख्या मोठी आहे. या भागात उन्हाळी भुईमूग लागवडीवर शेतकऱ्यांचा भर राहतो. पाण्याची सोय असलेले शेतकरी याची लागवड करतात. त्यामुळे या भागातील बाजार समितीत शेंगांची आवक सर्वाधिक होते. कारंजा बाजार समितीत हंगामात उन्हाळी शेंगाची आवक २५ हजार क्‍विंटलवर राहते, अशी माहिती कारंजा (वाशीम) बाजार समितीचे सचिव नीलेश भाकरे यांनी दिली.

शेणगाव, हिंगोली, मानोरा, आर्णी, यवतमाळ, पुसद, महान, अमरावती या बाजार समित्यांमध्ये देखील भुईमूग आवक मोठ्या प्रमाणावर होते. या भागात उन्हाळी भुईमुगाचा पॅटर्न असल्याने आवक नंतर होते. यंदा देशाच्या काही भागात भुईमुगाचा हंगाम चांगला राहिला आहे. परिणामी, शेंगाची आवक वाढती राहील.

कारंजासह वाशीम जिल्ह्याच्या काही भागांत गुजरातमधील भुईमूग शेंग प्रक्रिया तसेच शेंगदाणा कामी येत आहे. वाहतूक व इतर खर्चासह ४८०० ते ४९०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर त्यासाठी आकारला जात असल्याने तेथील बाजारात सध्या भुईमूग शेंग ४५०० ते ४६०० रुपये क्‍विंटल असेल, अशी शक्‍यता असल्याची माहिती अनिल पाकधने यांनी दिली.

कर्नाटकचा हंगाम आता सुरू झाला असून तेथील बाजारात आवक होत आहे. मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये खरीप लागवड असल्याने तेथील बाजारात सद्या मोठ्या प्रमाणात भुईमूग शेंगाची आवक होत आहे. गुजरात राज्यातील बाजारात एक लाख पोत्यांची रोजची आवक राहते.
अनिल पाकधने,भुईमूग शेंग व्यापारी, कारंजा, वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com