Agriculture Solar Technology: सौर ऊर्जेवर चालणारे कल्टिव्हेटर अन् कोळपणी यंत्र !

Rural Innovation: सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील तरुण अभियंते सौर ऊर्जेवर चालणारे कोळपणी यंत्र तयार करून शेतीतील इंधनखर्च कमी करण्याचे स्वप्न साकार करत आहेत. मातोश्री पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी 'टाकाऊतून टिकाऊ' या तत्त्वावर हे नाविन्यपूर्ण यंत्र विकसित केले आहे.
Young engineers and solar-powered harvesting machines
Young engineers and solar-powered harvesting machinesAgrowon
Published on
Updated on

Solar Powered Farm Equipment: धानोरे येथील मातोश्री पॉलिटेक्निकमधील अभियांत्रिकी पदविकेच्या अंतिम वर्षामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारे कल्टिव्हेटर अन् कोळपणी यंत्र बनवले आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या या कोळपणी यंत्राच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी बचत होणार आहे.

सध्या बैलचलित किंवा खनिज इंधनावर चालणाऱ्या कोळपणी यंत्रांचा वापर शेतकरी आंतरमशागतीच्या कामासाठी करतात. मात्र अल्पभूधारकांना त्याच्या इंधनावर होणारा खर्चही परवडत नाही. ही समस्या सोडविण्याच्या उद्देशाने धानोरे येथील मातोश्री पॉलिटेक्निकमधील यांत्रिकी अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी चंद्रकांत टोपले, उमेश महाले, मनोज गावित, खुशाली गावित यांनी सौर ऊर्जेवर चालणारे कल्टिव्हेटर अन् कोळपणी यंत्र बनवले आहे.

Young engineers and solar-powered harvesting machines
Agriculture Technology: आत्मनिर्भरतेला हवी तंत्रज्ञानाची जोड

‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेवर काम केल्यामुळे या विद्यार्थ्यांना यंत्राच्या निर्मितीसाठी केवळ आठ हजार रुपये इतका खर्च आला. या सोलर कल्टिवेटरमध्ये सौर पॅनल, दोन १२ व्होल्ट डीसी मोटर (३०० फेरे प्रति मिनिट) आणि चेन स्प्रॉकेट याद्वारे ऊर्जेचे वितरण यातून शेतीतील विविध पिकांमधील कोळपणी आणि आंतरमशागतीचे काम करणे शक्य होते.

हे संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालत असल्यामुळे डिझेल किंवा पेट्रोलसारख्या खनिज इंधनांचा वापर होत नाही. प्रति एकरी कोळपणीसाठी पेट्रोल किंवा डिझेल इंजिनसाठी ४०० ते ७०० रुपयापर्यंत खर्च येतो. अशा स्थितीमध्ये सौर ऊर्जेवर दोन ते अडीच तासांमध्ये एक एकर शेताची कोळपणी कोणत्याही खर्चाशिवाय शक्य होते.

Young engineers and solar-powered harvesting machines
Agriculture Technology: जैवतंत्रज्ञान, जैवरसायन तंत्रज्ञानाचा वापर

संशोधक विद्यार्थी सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील आहे. या विद्यार्थ्यांना प्रकल्पासाठी विभागप्रमुख योगेश खैरनार, विलास गुजर, अभिषेक जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गीतेश गुजराथी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सुरगाणा येथे शालेय शिक्षण घेतल्यानंतर येवला येथील मातोश्री पॉलिटेक्निकमध्ये शिष्यवृत्ती योजनेतून अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण घेत आहोत. अंतिम वर्षामध्ये आम्ही मित्रांनी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कल्टिव्हेटर हा प्रकल्प तयार केला आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून, अधिक चाचण्या घेतल्या जात आहेत.
चंद्रकांत टोपले, विद्यार्थी, रा. सुरगाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com