Paddy and Ragi Registration : भात व नाचणी विक्रीसाठी शेतकरी नोंदणीस मुदतवाढ

Paddy and Ragi : हमीभाव खरेदी केंद्रावर धान (भात) व रागी (नाचणी) विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Paddy and Ragi Registration
Paddy and Ragi Registrationagrowon
Published on
Updated on

Agriculture News : आधारभूत किंमत खरेदी योजना २०२३-२४ अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर धान (भात) व रागी (नाचणी) विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी पिकविलेले धान (भात) व नाचणी (रागी) हमीभावाने विक्री करायचा आहे. त्या शेतकऱ्यांनी मुदतीत खरेदी केंद्रावर समक्ष जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केले.

फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत शेतकरी नोंदणी सुरु आहे. चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित तुर्केवाडी, चंदगड तालुका कृषीमाल फलोत्पादन सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित दाटे, आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ मर्यादित.

राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादित सरवडे व राधानगरी तालुका ज्योतिर्लिंग सहकारी भाजीपाला खरेदी विक्री संघ मर्यादित राशिवडे. कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्योग खरेदी विक्री संस्था मर्यादित कोल्हापूर, भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादित गारगोटी व भुदरगड तालुका सहकारी कृषी औद्योगिक भाजीपाला व फळे खरेदी विक्री संघ मर्यादित गारगोटी. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर येथे नोंदणी सुरु आहे.

Paddy and Ragi Registration
Cat Show Kolhapur : कोल्हापुरात कॅट शोची भुरळ, १० परदेशी प्रजातींचा समावेश

शासनाने FAQ प्रतीच्या धान (भात) साठी २ हजार १८३ रुपये व रागी (नाचणी) साठी ३ हजार ८४६ रुपये प्रति क्विंटल हा हमीभाव जाहीर केला आहे. नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी हमीभावाने धान व नाचणी विक्री करीता याठिकाणी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केले.

अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, गडहिंग्लज व जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर येथे संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com