Khadi T Shirt Fashion: खादीचा टी शर्ट देतोय नवीन ‘लूक’

Success Story: वर्धा येथील गांधी विचारप्रणीत मगन संग्रहालय समितीने देशी कापसापासून निर्मित खादी कापडाला नैसर्गिक रंगाची रंगत आणली आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या देशी कापसाच्या धाग्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
Khadi T Shirt
Khadi T ShirtAgrowon
Published on
Updated on

Rural Innovation: वर्धा येथील गांधी विचारप्रणीत मगन संग्रहालय समितीने देशी कापसापासून निर्मित खादी कापडाला नैसर्गिक रंगाची रंगत आणली आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या देशी कापसाच्या धाग्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यापासून तयार केलेल्या खादी कापडातून टी-शर्ट निर्मितीचा आगळाच प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग असून, आजवर केवळ राजकारणी, पुढाऱ्यांचा पोशाख असलेल्या खादीला तरुणाईमध्ये लोकप्रिय करण्यासाठी खादीचे टी शर्ट महत्त्वाचे ठरणार आहेत.

Khadi T Shirt
Dairy Success Story : दुग्धव्यवसायात शून्यातून साधली भरभराट

टी-शर्ट निर्मितीत तमिळनाडू राज्यातील तिरपूर हे देशात प्रसिद्ध आहे. त्यासाठी साधारणतः लाइक्रा, पॉलिस्टर, नायलॉन, कॉटन या धाग्यांचाच वापर केला जातो. खादी केवळ वस्त्र नसून विचार आहे, तो प्रत्यक्ष जगण्यातून स्वीकारायला हवा, हा महात्मा गांधींचा विचार जपण्याचे काम वर्धा येथील मगन संग्रहालय करत आहे. खादीच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण प्रयोग करण्यामध्ये सातत्य ठेवणाऱ्या मगन संग्रहालय समितीने अनेक वर्षे संशोधन आणि अभ्यासातून टी शर्ट निर्मितीला प्रारंभ केला आहे. विशेष म्हणजे, सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या कापसापासून तयार केलेली खादी आणि अशा खादीच्या कापडापासून टी शर्ट बनवले जात आहेत. त्यातील वैविध्यपूर्ण रंगसंगती, डिझाइन युवा पिढीला नक्कीच भुरळ घालू शकतात.

Khadi T Shirt
Agriculture Technology: ट्रॅक्टरचलित प्लॅस्टिक मल्चिंगसह पेरणीचे यंत्र विकसित

मगन संग्रहालय समितीने समुद्रपूर तालुक्यात २००७ पासून नैसर्गिक शेतीची चळवळ उभारली आहे. हजारो शेतकरी या चळवळीशी जोडलेले आहेत. ते विविध पिकांचे उत्पादन घेतात. यामध्ये देशी कापूस उत्पादनावर भर दिला जातो. शेतमालाचे मूल्यसंवर्धन व्हावे यासाठी हळद, डाळ, मसाले, गहू, ज्वारी आदी उत्पादनांवर प्रक्रिया करणारी यंत्रसामग्री या केंद्रावर कार्यान्वित आहे. या केंद्रावरून शेकडो गावातील पाच हजारांपेक्षा अधिक शेतकरी सुविधा घेत आहेत. संस्थेच्या माध्यमातून गिरड येथे नैसर्गिक शेती विकास केंद्राची स्थापना केलेली आहे. गावातील युवा शेतकरी या केंद्राचे संचालन करतात. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसावर सेंद्रिय कापूस केंद्रावर उत्पादन ते पेळूपर्यंतची प्रक्रिया केली जाते.

मगन संग्रहालयात खादीपासून निर्मित टी-शर्टमध्ये पूर्णतः नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला. हे नैसर्गिक रंग डाळिंब-बाभळीची साल, बिहाडा, झेंडू-पळसाची फुले, मंजिष्ठाची मुळे, नीळ, काथ आदींपासून तयार करून कापड रंगवतात. या माध्यमातून बदलत्या पोषाखाला नैसर्गिक खादीचा पर्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
मुकेश लुतडे, प्रमुख, खादी विभाग, मगन संग्रहालय, वर्धा
खादी वस्त्र नव्हे, तर ताे एक विचार आहे, असे मूल्य महात्मा गांधी यांनी रुजविले. या मूल्यांची मगन संग्रहालय जोपासना करीत आहे. ग्रामोद्योग, ग्रामीण रोजगारनर्मिती, बचतगट संघटन, नैसर्गिक शेती, शेतकरी संघटन, ग्रामीण स्वच्छता व आरोग्य, मृदा व जलसंवर्धन, आरोग्यविषयक जनजागृती, तेल स्वराज्य अभियान, देशी बीजसंवर्धन अभियान, नैसर्गिक शेती अभियान समाजाभिमुख करणे अशी ध्येये ठेवत आमचे काम सुरू आहे.
डॉ. विभा गुप्ता, अध्यक्ष, मगन संग्रहालय समिती, वर्धा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com