Aromatic Business: फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती: सुवासिक व्यवसायाची संधी!

Aromatic Processing: फुले ही आपल्या रंग, गंध आणि अस्तित्वानेही माणसांना आनंद देण्याचे काम करतात. मात्र बहुतांश फुले ही फार काळ टिकत नाहीत. त्यातील आनंददायी गुणधर्म दीर्घकाळ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने विविध प्रक्रिया उत्पादने पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने बनवली जातात. त्याविषयी या लेखातून माहिती घेऊ.
Gulkand Production
Gulkand ProductionAgrowon
Published on
Updated on

डाॅ. ए. पी. गरडे

Aroma Industry: ले नाजूक असून, त्यांचे जीवनमान खूपच कमी असते. फुलांच्या एकूण उत्पादनांपैकी २० ते ३० टक्के उत्पादन वाया जाते. बाजारपेठेतील ताज्या फुलांच्या दरामध्येही फार चढ-उतार होत असतात. अशा वेळी आपण फुलांपासून गुलाबजल, उटणे, गुलकंद अशी उत्पादने बनविता येतात. त्याच प्रमाणे सुगंधी द्रव्ये किंवा अत्तरांची निर्मिती करता येते.

फुल पिकांमध्ये प्रत्यक्ष धोरण, अप्रत्यक्ष धोरण व प्रक्रिया या तीन रणनीतीचा वापर करता येतो. प्रत्यक्ष धोरणामध्ये योग्य वेळी व योग्य परिपक्वतेला फुलांची काढणी करणे, प्रतवारी करणे, योग्य पद्धतीने वाळवणी करणे आणि पॅकिंग करणे यांचा समावेश होतो. फुले सुकविण्याच्या विविध पद्धती आहेत. उदा. उन्हात वाळविणे, ड्रायरमध्ये वाळविणे, ग्लिसरीन ड्रायिंग, फ्रीज ड्रायिंग, प्रेस ड्रायिंग इ. फुलांना पॅकिंग करताना वर्तमानपत्र, प्लॅस्टिक पिशव्या, सीएफबी बाॅक्स यासारखे पॅकिंग साहित्य वापरले जाते. त्यामुळे फुलांचे जीवनमान वाढण्यास मदत होते.

Gulkand Production
Flower Market: व्हॅलेंटाइन डे’साठी गुलाब आवकेत वाढ

अप्रत्यक्ष रणनीतीमध्ये फुलांची गुणवत्ता तपासली जाते. त्यात फुलांचा रंग, फुलांचा आकार, दांड्याची लांबी आणि फुलांच्या पाकळ्यांची संख्या यांचा समावेश होतो. प्रक्रिया या तिसऱ्या रणनीतीमध्ये फुले वाळवून पावडर बनवणे, अगरबत्ती बनवणे, गुलाबजल व गुलकंद बनविणे, पेस्ट बनविणे, सुगंधी द्रव्य व अत्तर निर्मिती, सुवासिक तेल व साबणांची निर्मिती यांचा समावेश होतो. यातील अनेक उद्योगांना फारशा भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता नाही. असे छोटे उद्योग फूल उत्पादक शेतकरी व त्यांचे गट नक्कीच करू शकतात.

सुवासिक व सुगंधी तेल निर्मिती

गुलाब फुलापासून सुवासिक व सुगंधी तेलनिर्मिती करण्यासाठी तीन पद्धती उपयोगी पडतात.

१) पाणी ऊर्ध्वपातन प्रक्रिया

२) स्टीम डिस्टिलेशन प्रक्रिया

३) साॅल्व्हेंट डिस्टिलेशन प्रक्रिया

Gulkand Production
Mahua Flower Processing : महाजन यांनी मोहाचे केले मूल्यवर्धन

पाणी ऊर्ध्वपातन (वॉटर डिस्टिलेशन) प्रक्रिया

ही एक साधी, सोपी, सरळ पद्धत असून, त्यात डिस्टिलेशन युनिटमध्ये गुलाबाच्या पाकळ्या उकळत्या पाण्याच्या थेट संपर्कात येतात. पाण्याची वाफ होत असताना गुलाब किंवा अन्य फुलातील सुगंधी द्रव्ये त्यात मिसळली जातात. पाण्यामध्ये तेल जास्त गरम होत नाही. त्यानंतर पुढे ते पाणी थंड केले जाते. त्यातील घन पदार्थ वेगळे काढले जातात. उरलेले पाणी हे गुलाबजल असते. तर त्यावर तरंगणारा थर हा सुगंधी व सुवासिक तेलाचा असतो. ते वेगळे केल्यानंतर आपल्याला गुलाबजल व तेल वेगळे मिळू शकते.

बाष्प ऊर्ध्वपातन (स्टीम डिस्टिलेशन) पद्धत

फुले किंवा सुगंधी वनस्पती घटक असलेल्या भांड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाफ सोडली जाते. त्यामुळे फुलांमधील सुगंधी रेणू मोकळे होतात.ते पाण्यामध्ये मिसळले जाऊन बाष्पामध्ये रूपांतरित होतात. पुढे ते बाष्पयुक्त सुगंधी संयुगे कंडेन्सेशन फ्लास्क किंवा कंडेन्सरकडे नेली जातात. तिथे दोन वेगळ्या पाइपमुळे गरम पाणी एका बाजूला बाहेर पडते, तर थंड पाणी कंडेन्सरमध्ये खाली येते. ते त्याखाली असलेल्या रिसेप्टॅकलमध्ये जमा होतो. पाणी आणि तेल वेगळे केले जात असल्यामुळे त्याला विभाजक म्हणतात. या पद्धतीत तेलाचा दर्जाही चांगला मिळतो. (काही तेलयुक्त घटक पाण्यापेक्षा जड असतात, म्हणून ते विभाजकाच्या तळाशी आढळतात.)

विद्रावक ऊर्ध्वपातन (साॅल्व्हेंट डिस्टिलेशन) पद्धत

साॅल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन पद्धतीमध्ये पुलांपासून सुगंधी तेल काढण्यासाठी हेक्सेन आणि इथेनाॅल सारख्या अन्नदर्जाच्या विद्रावकाचा (साॅल्व्हेंट) वापर केला जातो. विशेषतः ज्या फुलांमध्ये तेलाचे प्रमाण अत्यंत कमी असते, त्यासाठी ही पद्धती योग्य मानली जाते. तसेच रेझिन्सचे प्रमाण अधिक असलेल्या व त्याला सुगंधी द्रव्यांवर परिणाम होण्याची शक्यता असल्यास या पद्धतीचा वापर केला जातो. अन्य पद्धतीपेक्षा ही पद्धत अधिक कार्यक्षम आहे. त्यातून अस्थिर मेण आणि रंगद्रव्यांसारखी सामग्रीदेखील वेगळी काढली जाते. प्रक्रियेसाठी वापरलेल्या विद्रावकामुळे त्यात मेणयुक्त सुगंधी संयुगे तयार होतात. हा तुलनेने घट्ट झालेला पदार्थ अल्कोहोलमध्ये मिसळल्यानंतर त्यातून तेलाचे कण बाहेर पडतात प्रक्रियेत वापरलेली वरील विद्रावके तेलातच राहतात. ते तेल सुगंधी अत्तरांमध्ये किंवा द्रव्यांमध्ये राहतात. त्याचा वापर परफ्यूम किंवा सुगंधावर आधारित उपचारपद्धतीमध्ये वापरले जातात.

गुलाबाच्या फुलांपासून गुलकंद निर्मिती

ताजे गुलाब काढून घेऊन त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात.

त्या स्वच्छ पाण्याने धुऊन वाळवाव्यात.

एका भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर घोटून घ्यावी. एका कढईत हे मिश्रण साधारणतः २ ते ३ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावे.

डाॅ. ए. पी. गरडे ८४०८८३८४५० (सहायक प्राध्यापक, उद्यान विद्या विभाग,

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com