HSC Exam 2025 : बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन उत्साहात स्वागत

12th Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारपासून (ता. ११) इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या.
12th Exam
HSC ExamAgrowon
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारपासून (ता. ११) इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या. राहू येथील कैलास विद्या मंदिरातील परीक्षा केंद्रांवर सकाळी दहाच्या सुमारास परीक्षार्थी पालकांसमवेत दाखल झाले होते.

राहू येथील परीक्षा केंद्रावर कैलास विद्या मंदिर अँड ज्युनिअर कॉलेज राहू, न्यू इंग्लिश स्कूल पारगाव, न्यू इंग्लिश स्कूल खामगाव या शाळांतील एकूण ४९१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. परीक्षेसाठी पंचवीस पर्यवेक्षक नेमल्याचे सांगण्यात आले.

12th Exam
Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षांच्या जादूगार

कला, विज्ञान, वाणिज्य, व्यवसाय शिक्षण या शाखेद्वारे एकूण ४९१ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. वीस वर्ग खोल्यांमध्ये परीक्षा शांततेत व सुरळीतपणे सुरू आहे. परीक्षा कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यवत पोलिसांच्या वतीने सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

12th Exam
Copy Free Exam : कॉपीमुक्त अभियानासाठी आवश्यक यंत्रणेचा वापर करा

मंगळवारी (ता. ११) सकाळी परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व परीक्षार्थींचे कैलास शिक्षण मंडळ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने गुलाबपुष्पे देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी केंद्र संचालक शांताराम टिळेकर, प्राचार्य प्रकाश जगदाळे, आर. जी. शिंदे, केंद्रप्रमुख अजित पवार, पी. ए. देशमुख यांच्यासह ज्युनिअर कॉलेजचे सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या वतीने तपासणी करून सोडण्यात आले. कॉपीमुक्त अभियानासाठी शाळा प्रशासनाच्या वतीने कडक व्यवस्था करण्यात आल्याची त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com