Crop Insurance : ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या ‘हातावर तुरी’

पीकविमा कंपनीचे शेतकऱ्यांना लुटण्याचे धोरण सुरूच असून २५ टक्के अग्रीम रक्कम खात्यात अद्याप जमा करण्यात आलेले नाही.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

देगलूर ः पीकविमा कंपनीचे (Crop Insurance) शेतकऱ्यांना लुटण्याचे धोरण (Farmer Robbing Policy) सुरूच असून २५ टक्के अग्रीम रक्कम खात्यात (Advanced Crop Insurance) अद्याप जमा करण्यात आलेले नाही. दुष्काळी निधी (Drought Fund) जिल्हा मध्यवर्ती बँकेत पैसे येऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात आजतागायत दुष्काळ निधी जमा करण्यात आलेला नाही.

Crop Insurance
Crop Damage : मराठवाड्यात नुकसान क्षेत्र पोहोचले ३० लाख हेक्टरवर

तसेच पीएम किसान सन्मान निधीतील त्रुटींमुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहिले असतानाही प्रशासनाला अथवा लोकप्रतिनिधीला याचे काहीही सोयरसुतक राहिलेले नाही. दिवाळीसारखा सण शेतकऱ्यांना अंधारात साजरा करावा लागला. त्यामुळे शुक्रवारी (ता.२८) रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी संतप्त होत येथील तालुका कृषी कार्यालयाला बोंबाबोंब करून कुलूप ठोकले.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा भरपाईसाठी ४९ लाख पूर्वसूचना

या वेळी शेतकऱ्यांनी कैलास येसगे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन दिले. काँग्रेस भारत जोडो यात्रेमध्ये असून, शिवसेना बेरोजगारांचा मेळावा भरवीत आहे, तर राष्ट्रवादी आगामी निवडणुकीत मशगुल आहे. सत्ताधारी भाजप, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना तर या सर्व घटनांचा काहीही सोयरसुतक राहिलेले नाही, एकीकडे शेतकरी रब्बी पिकाच्या पेरणीसाठी बांधावर असून घरी दिवाळी सारखा सण हे त्याला साजरा करता आला नाही मात्र कोणत्याच पक्षाकडून यावर आवाज उठविला जात नसल्याने प्रशासनही ठप्प झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तहसील व कृषी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी भेटले नसल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात बोंब ठोकून कार्यालयाला कुलूप ठोकले. शेतकऱ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य नाही झाल्या तर यापेक्षाही आक्रमक आंदोलन करू असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com