Voter Trust: मतदारांचा विश्वास ठरवा सार्थ

Election Transparency: आपल्या देशातील मतदार सामान्य असेल पण त्याचे मत असामान्य आहे. कारण त्या मतातूनच निवडून येणाऱ्या पक्षांचे आणि उमेदवारांचे सरकार तयार होत असते. त्यामुळे जनतेच्या विश्वासाला पात्र राहणे पक्षांचे आणि उमेदवारांचे नैतिक कर्तव्य आहे.
Voter
VoterAgrowon
Published on
Updated on

Democratic Election: २५जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने देशभर मतदार म्हणून बहुतेक ठिकाणी प्रतिज्ञा घेण्यात आली. याच दिवशी‘ईव्हीएम मशीन हटाव-देश बचाओ’ असा नारा देत महाविकास आघाडीने निषेधाचा सूर लावला. निवडणुका आणि जय-पराजय हा ठरलेला आहे. पण पराजय वाट्याला आल्यानंतर निषेधाचे सूर टोकदार होतात.

संबंधितांनी आक्षेप नोंदवल्यानंतरही भारत निवडणूक आयोग आपली योग्य बाजू मांडत असेल आणि आक्षेप नोंदवणाऱ्यांचे शंका-समाधान करीत असेल, तर अशावेळी या निषेधाच्या सुराचे गांभीर्य जपले जाते का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. मतदार योग्य उमेदवाराला मत देत असतील आणि त्यातून धक्कादायक निकाल जाहीर होत असतील तर अशावेळी ते निकाल स्वीकारणे अपरिहार्य असतेच. मग निवडणुका झाल्यावर पराजयाचे खापर यंत्रणेवर किंवा यंत्रावर फोडणे सयुक्तिक वाटत नाही.

Voter
Maharashtra Politics: कुणीच अन् कधीच संपत नसतं

देशातील अनेक पक्षांची विचारधारा मतदारांना माहीत झालेली आहे. आपल्या देशामध्ये सत्ताधाऱ्यांना कौल मिळतो आणि कधीमधी सत्ताधाऱ्यांना कौल नाकारले सुद्धा जातो, असे प्रसंग अनेक निवडणुकांमध्ये यापूर्वी घडलेले आहेत. त्यामुळे संबंधितांनी मतदारांच्या मतांचे मूल्य जाणण्यासाठी विकासाचे योगदान शाश्वत करणे अपेक्षितच आहे. आपण एकदा निवडून आलो म्हणजे परत मतदारांनी आपल्यालाच निवडून दिले पाहिजे, अशी अपेक्षा ही राजकारणातली मक्तेदारी आहे.

जनतेचे प्रश्न सोडून त्यांना आपण कितपत दिलासा देतो, याचा विचार निवडणुकीपूर्वी प्रत्येक उमेदवाराने केला तर निवडणुकीत दमछाक होत नाही. पराभवही टाळता येतो. मतदाराकडे असलेले मतदान हे शस्त्र आहे आणि सुरक्षितता सुद्धा आहे. ज्यावेळेस मतदारांना आपले जीवन सुरक्षित वाटते, त्यावेळी योग्य पक्षाला आणि योग्य उमेदवाराला मतदार आपले अमूल्य मत देत असतात. म्हणून मतदार सामान्य मानता येत नाहीत. राजकीय धुरीणांनी आता मैदानावर काम करणे गरजेचेच आहे.

Voter
Indian Politics : कॉँग्रेस-‘आप’चा कलह विकोपाला

निवडणुका पारदर्शी असाव्यात, त्यातील हाणामारीच्या घटना, निवडणुकीतील प्रलोभने, मतदान केंद्र ताब्यात घेणे, बोगस मतदान करणे, या वाईट कृत्यांना पायबंद घातलाच पाहिजे. सत्ता संघर्षातून महाराष्ट्रात आज काय घडत आहे? सत्तेने निर्माण केलेली दहशत आणि विरोधकांना जीवनातून उठवण्याचे अमानवीय कृत्ये ही आजच्या राजकारणाची रीत समजायची का? जनतेला पिचून काढण्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करून पिंजून काढा ना!

यातून मतदानाचा टक्का वाढेल आणि मतदार दिन साजरा करण्याचा उद्देशही साध्य होईल. विविध उपक्रम राबवून, मतदानाचे महत्त्व सांगूनही मतदानाची टक्केवारी ६० ते ७० टक्क्यांपर्यंतच राहते. राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून प्रत्येक मतदाराने मतदान करणे श्रेष्ठ दर्जाचेच आहे. पण मतदारांचा मतदानासाठीचा निरुत्साह नाराजीचा तर उद्रेक नाही ना? याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

आपल्या देशाच्या एकूणच विकासासाठी लोकशाहीत लोकांचे महत्त्व अबाधित ठेवलेच पाहिजे. मतदारांनीही जबाबदारीने मतदान केलेच पाहिजे. लोकांमधून लोकशाहीतील सरकार आकाराला येणार असेल तर, लोकांचा आधार महत्त्वाचा असतो. समृद्ध लोकशाही करिता लोक महत्त्वाचे आहेत. आता लोकांनीही कोण काय सांगतोय? यापेक्षा कोण काय करतोय? याकडे लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे सत्तेची भाकर फिरत आहे का?

हेही विरोधी पक्षांनी जाणले पाहिजे. बोलण्याचे सपाटीकरण करण्यापेक्षा समर्थपणे राजकारण केले पाहिजे. विकासाचे पर्व निर्माण करून टिकवले पाहिजे. यासाठी लोकांची साथ आणि लोकांचा विश्वास निवडणुकीतून संपादन करावा लागतो. निवडणुकीनंतरही निषेधाचे सूर मतदार दिनाला काढणे आणि त्यातून वेळ घालवणे फारच उथळ आहे. सेवेची साधने सांभाळून आपले अस्तित्व सांभाळणे याकरिता लोकांच्या मतदानाचे मूल्यही सांभाळावेच लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com