शेतमालाची निर्यात २५ टक्क्यांच्या वाढीसह ४० अब्ज डॉलर्सवर

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या दहा महिन्यात भारतीय शेतमालाची निर्यात २५.१४ टक्क्यांनी वाढून ४०.८७ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
Agriculture Product Export
Agriculture Product ExportAgrowon
Published on
Updated on

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या दहा महिन्यात भारतीय शेतमालाची निर्यात २५.१४ टक्क्यांनी वाढून ४०.८७ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री (Minister Of State For Commerce) अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) यांनी बुधवारी (ता.३०) लोकसभेत याबाबतची माहिती दिली. गहू (Wheat Export), साखर (Sugar) आणि कापूस (Cotton) यासारख्या प्रमुख शेतमालाच्या निर्यातीत चालू वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पटेल यांनी सांगितले. (Agriculture Product Export Rising by 25 Percent)

Agriculture Product Export
भारतातून व्यापारी वस्तुंची विक्रमी निर्यात

चालू आर्थिक वर्षातील (Current Financial Year) एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ या दहा महिन्याच्या कालावधित मागील वर्षाच्या तुलनेत शेतमालाच्या निर्यातीत (Export Of Agri Product) २५.१४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ज्याचे मूल्य ४०.८७ अब्ज डॉलर इतके आहे. मागील वर्षी याच कालावधीत ३२.६६ अब्ज डॉलरच्या शेतमालाची निर्यात झाली होती. लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पटेल यांनी ही माहिती दिली.

Agriculture Product Export
अपेडाची शेतमाल निर्यात २३ टक्क्यांनी वाढून १९.७ अब्ज डॉलर्सवर

शेतमालाच्या निर्यातीबाबत बोलताना पटेल म्हणाल्या की, काही शेतमालांसाठी निर्यात उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ज्यामध्ये तांदूळ, तृणधान्ये, कॉफीपासून बनणारे पदार्थ, मांस (Meat), डेअरी उत्पादनासह (Dairy Product) पोल्ट्री (Poultry Product), आणि सागरी उत्पादनांचा (Marine Product Export) समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात ही उत्पादने निर्धारित उद्दिष्टे गाठतील किंवा त्याच्या जळपास पोहोचतली. कृषी निर्यातील वाढीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही सकारात्मक परिणाम होतो, असे पटेल म्हणाल्या.

निर्यातीचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी केंद्र सरकारने शेतकरी उत्पादक संस्था (FPO), शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) यांना निर्यातदारांशी थेट संपर्क साधता यावा, यासाठी फार्मर कनेक्ट पोर्टल सुरू केले असल्याचे पटेल यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com