

पुणे (वृत्तसंस्था) : इतिहासात पहिल्यांदाच देशातून मालाच्या निर्यातीचे ठरवलेले उद्दिष्ट साध्य झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. बुधवारी (ता. २३) केलेल्या एका ट्विटद्वारे मोदींनी ही माहिती दिली. मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटल्यानुसार भारताने ४०० अब्ज डॉलर किमतीचा माल निर्यात (goods export) करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दीष्ट ठेवले होते. ते पहिल्यांदाच साध्य झाले आहे.
या उद्दिष्टपूर्तीसाठी पंतप्रधानांनी (Prime Minister) शेतकरी, विणकरी, सुक्ष्म-लघू-मध्यम उद्योग, आणि निर्यातदारांचे अभिनंदन केले आहे. आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. २०२१ या आर्थिक वर्षात भारताची निर्यात २९८.१ अब्ज डॉलरवर (billion dollars) राहिली होती.
India set an ambitious target of $400 Billion of goods exports & achieves this target for the first time ever. I congratulate our farmers, weavers, MSMEs, manufacturers, exporters for this success. This is a key milestone in our Aatmanirbhar Bharat journey. #LocalGoesGlobal pic.twitter.com/zZIQgJuNeQ
या माहितीप्रमाणे देशातून निर्यातीसाठी दिलेले उद्दिष्ट (targeted export) ठरवलेल्या कालमर्यादेच्या नऊ दिवस आधीच साध्य झाले आहे. याविषयी केंद्राने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार प्रत्येक तासाला देशातून ४६० लाख डॉलर मूल्याच्या मालाची निर्यात होत होती. याविषयी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Commerce Minister) यांनीही ट्विट करत भारत एक ‘एक्सपोर्ट पावरहाऊस’ बनण्याच्या मार्गावर असल्याचा दावा केला आहे.
एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या काळात देशातून ३७४.८१ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. त्याआधीच्या वर्षी याच कालावधीत हा आकडा २५६ अब्ज डॉलरचा होता. त्यामुळे एका वर्षात निर्यातीत ४६.०९ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.