Rain Update : औंदा भरभरून बरसला वरुण राजा

मॉन्सून काळात राज्यात २३ टक्के अधिक पाऊस. कोकणात सरासरी गाठली
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : यंदाच्या मॉन्सून हंगामात (Monsoon Season) (जून ते सप्टेंबर) राज्यात दमदार पावसाने हजेरी (Rain) लावली आहे. मॉन्सून काळात सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात १२१९.७ मिलिमीटर म्हणजेच २३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. कोकणात (Konkan) पावसाने सरासरी गाठली (Average Rain) आहे. उर्वरित राज्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. राज्यात अद्यापही मॉन्सून सक्रिय असल्याने अनेक भागांत पाऊस सुरूच आहे.

Rain Update
Soybean Rate : सोयाबीन दर सुधारतील का?

यंदा जून महिन्यात पावसाने दडी दिल्यानंतर उर्वरित तिन्ही महिन्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. १ जून ते ३० सप्टेंबर हा मॉन्सून पावसाचा हंगाम मानला जातो. या कालावधीत राज्यात दीर्घकालीन सरासरीनुसार ९९४.५ पाऊस पडतो. यंदा राज्यात तब्बल १२१९.७ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या तुलनेत २३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सातत्याने पाऊस पडला. अतिवृष्टी झालेल्या भागात ओल्या दुष्काळाची स्थिती आणखी बिकट झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

Rain Update
Sugar Export : साखर निर्यात खुल्या की कोटा पद्धतीने?

यंदाच्या हंगामात गेली अनेक वर्ष गायब असलेला झडीचा पाऊस अनुभवायला मिळाला. यातच कमी कालावधीत झालेला जोरदार पाऊस, असमान वितरण हे वैशिष्ट्य ठरलेल्या पावसाने राज्यातील जवळपास सर्वच धरणे ओसंडून वाहिल्याचे दिसून आले. विभागनिहाय पडलेल्या पावसाची स्थिती पाहता सप्टेंबर अखेरपर्यंत कोकण विभागात सरासरी इतका (९ टक्के अधिक) पाऊस झाला. उर्वरित विभागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. मराठवाड्यात सरासरीपेक्षा २४ टक्के, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २६ टक्के तर विदर्भात सरासरीपेक्षा ३१ टक्के अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून दिसून येते.

Rain Update
Maize Rate : मका दरातील तेजी टिकेल का? | Agrowon

‘मॉन्सून’मधील विभागनिहाय पाऊस
विभाग---सरासरी---पडलेला---टक्केवारी
कोकण-गोवा---२८७०.८---३१३६.२---९
मध्य महाराष्ट्र---७४७.४---९४२.३---२६
मराठवाडा---६४२.८---७९४.२---२४
विदर्भ---९३७.३---१२२७.८---३१
----
नाशिकमध्ये सर्वाधिक, सांगलीत सर्वात कमी
राज्यातील जिल्हानिहाय पडलेल्या पावसाची स्थिती विचारात घेता यंदा नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. नागपूर, वर्धा, नांदेड जिल्ह्यांतही दमदार पाऊस झाला आहे. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. सांगली जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असली तरी १८ टक्के कमी पाऊस पडला आहे. याशिवाय हिंगोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा ११ टक्के, अकोला जिल्ह्यात ५ टक्के, तर मुंबई शहरात ८ टक्के कमी पाऊस पडला आहे.
...........

Rain Update
Organic Jaggery : सेंद्रिय गूळ, हळदीचा तयार केला ब्रॅण्ड

जिल्हानिहाय पावसाचे प्रमाण (तफावत टक्क्यांत) :
- सरासरीपेक्षा खूप सर्वाधिक (५९ टक्क्यांहून अधिक) :
नाशिक
........
- सरासरीपेक्षा अधिक (२० ते ५९ टक्के अधिक) :
पालघर, ठाणे, धुळे, नगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
...............
- सरासरी इतका (उणे १९ ते १९ टक्के अधिक) :
मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, जळगाव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती.

मॉन्सूनमधील जिल्हानिहाय पाऊस (सरासरीच्या तुलनेत तफावत) :
जिल्हा---सरासरी---पडलेला---तफावत
मुंबई शहर---२०९४.५---१९१६.७---उणे ८
पालघर---२२६२.७---३०४८.५---३५

रायगड---३१२७.४---३२१२.३---३
रत्नागिरी---३१९४.४---३३३४.७---४
सिंधुदुर्ग---२९५०.७---३१९५.९---८
मुंबई उपनगर---२३१८.८---२६५८.३---१५
ठाणे---२४३३.३---३०४४.०---२५
नगर---४५६.०---५९४.२---३०
धुळे---५४३.९---७४१.५---३६
जळगाव---६२५.२---६९३.७---११
कोल्हापूर---१७११.४---१९५५.५---१४
नंदूरबार---८४१.६---९४८.०---१३
नाशिक---८९३.९---१४३५.८---६१
पुणे---९४९.२---१२६५.३---३३
सांगली---४८६.१---३९६.६---उणे १८
सातारा---८४४.६---१०६४.९---२६
सोलापूर---४५८.१---४८३.३---५
औरंगाबाद---५६३.६---७४८.१---३३
बीड---५५७.४---६६७.५---२०
हिंगोली---७५८.३---६७२.७---उणे११
जालना---५९१.८---६७१.३---१३
लातूर---६६६.८---८४०.८---२६
नांदेड---७६२.६---११४५.९---४६
उस्मानाबाद---५७९.६---७३३.२---२६
परभणी---७०४.९--७५५.१---७
अकोला---६९४.२---६६०.३----उणे ५
अमरावती---८२२.९---९५३.८---१५
भंडारा---१०८५.१---१४८९.३---३७
बुलडाणा---६४७.६---६५८.०---२९
चंद्रपूर---१०७६.३---१३९१.०---२९
गडचिरोली---१२८९.७---१७९९.३---४०
गोंदिया---१२१४.७---१६४१.८---३५
नागपूर---९३८.५---१४४५.७---५४
वर्धा---८४०.८---१३१०.०---५६
वाशीम---७७२.३---८०८.३---५
यवतमाळ---८०८.०---१०८७.३---३४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com