Cotton Rate : जुलैनंतर खरचं कापसाचे भाव पडतील का? कापसाचे भाव कशामुळे कमी झाले? पुढे काय होईल ?

Market Update : द साऊदर्न इंडिया मिल्स असोसिएशन अर्था सीमा या संघटनेने आपल्या सदस्यांना आव्हानं केलं की जुलैनंतर जागतिक बाजारात कापसाचा पुरवठा पाढून भाव कमी होणार आहेत.
Cotton
CottonAgrowon

Pune News : देशातील बाजारात कापसाचे भाव वाढत असतानाच उद्योगांनी पुन्हा मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरु केलं. द साऊदर्न इंडिया मिल्स असोसिएशन अर्था सीमा या संघटनेने आपल्या सदस्यांना आव्हानं केलं की जुलैनंतर जागतिक बाजारात कापसाचा पुरवठा पाढून भाव कमी होणार आहेत.

त्यामुळे पॅनिक होऊन कापूस खरेदी करू नये. ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि इतर देशांमधील उत्पादन यंदा वाढल्यामुळे पुढ कापसाचे भाव पडतील, असाही दावा या संघटनेने केला. पण जागतिक बाजारातील मागणी-पुरवठा, या देशांमधील उत्पादन आणि निर्यात पाहीलं तर उद्योगांचा हा दावा खोटा ठरण्याची शक्यता आहे. 

उद्योगांनी जुलैपासून कापूस पुरवठा वाढेल असे म्हटले आहे. मग जुलैनंतर कोणकोणत्या देशांचा कापूस येतो? तर ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाचा. ब्राझीलमध्ये कापसाची लागवड होते जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात. तर काढणी होते जून ते सप्टेंबर या काळात.

ऑस्ट्रेलियात दोन किंवा तीन टप्प्यात लागवड होते. उत्तरीय ऑस्ट्रेलियातील लागवड जानेवारी ते मार्च या काळात होऊन काढणी जून ते ऑगस्ट दरम्यान होते. तर ऑस्ट्रेलियातील दुसरा टप्पा असतो ऑगस्ट ते डिसेंबर लागवडीचा आणि काढणी होते जानेवारी ते जुलै दरम्यान. 

Cotton
Cotton Productivity : क्षेत्र कमी तरीही वाढली कापसाची उत्पादकता

जागतिक पातळीवर कापूस उत्पादनात चीन, भारत, ब्राझील, अमेरिका, पाकिस्तान, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया असा नंबर आहे. यंदा ब्राझीलचे कापूस उत्पादन वाढले. पण अमेरिकेतील उत्पादन घटले. त्यामुळे ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आला. ऑस्ट्रेलियाचे उत्पादन मात्र यंदा १८ टक्क्यांनी घटले आहे. 

तर जागतिक कापूस उत्पादनात यंदा गेल्यावर्षीपेक्षा घट होणार आहे. मात्र कापसाची मागणी वाढणार आहे, असा अंदाज अमेरिकेचा कृषी विभाग म्हणजेच युएसडीएने दिला.

यंदाचे कापूस उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी कमी होऊन १ हजार ४४४ लाख गाठींवर स्थिरावणार आहे. पण वापर ३ टक्क्यांनी वाढून १ हजार ४३८ लाख गाठींवर पोचणार आहे. तसेच उत्पादनाचा अंदाज जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात घटवण्यात आला. 

जागतिक बाजारात सध्या कापसाला चांगली मागणी आहे. अमेरिकेचा ८० टक्के कापूस विकून झाला. भारतातही ७५ टक्के कापूस बाजारात आला. आता ब्राझीलचे उत्पादन वाढले. पण ब्राझीलचा कापूस बाजारात दाखल व्हायला ऑगस्टच उजाडेल. कारण जूनपासून काढणी सुरु झाली तरी काढणी वेग घ्यायला वेळ लागले.

तसेच हा कापूस आयात कारायचा म्हटला तरी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागेल. तसेच जागतिक बाजारात तेजी असल्यास तेथील शेतकरी कमी भावात तर कापूस विकणार नाहीत. 

Cotton
Cotton Farming : कापूस वधारला; अन्नधान्य उत्पादन समाधानकारक

थोडक्यात काय आपले शेतकरी मे महिन्यापर्यंत कापूस विकत असतात. तोपर्यंत तर जागतिक बाजारात कापसाची मागणी चांगलीच राहील. सध्या आपला कापसाचा भाव आहे प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान.

तर आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव ९ हजारांच्या आसपास आहे. ११ टक्के आयातशुल्कासह हा भाव ९ हजार ८०० रुपये होतो. त्यामुळेच देशातून निर्यातही चांगली सुरु आहे. खुद्द उद्योगानींही सांगितले की यंदा कमीत कमी २० लाख गाठी कापूस निर्यात होईल. 

थोडक्यात काय आपले शेतकरी मे महिन्यापर्यंत कापूस विकत असतात. तोपर्यंत तर जागतिक बाजारात कापसाची मागणी चांगलीच राहील. सध्या आपला कापसाचा भाव आहे प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान.

तर आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव ९ हजारांच्या आसपास आहे. ११ टक्के आयातशुल्कासह हा भाव ९ हजार ८०० रुपये होतो. त्यामुळेच देशातून निर्यातही चांगली सुरु आहे. खुद्द उद्योगानींही सांगितले की यंदा कमीत कमी २० लाख गाठी कापूस निर्यात होईल. 

उद्योगांनी जुलैपासून कापूस भाव कमी होतील असे म्हटले आहे. पण तोपर्यंत देशातील कापूसही कमी होईल. भारत आयात करणार म्हटल्यावर आंतरराष्ट्रीय बाजारातही भाव वाढतो. हा आपला आजवरचा अनुभव आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात चढ उतार झाले तरी पॅनिक सेलिंग टाळावे. तसेच दोन किंवा तीन टप्प्यात कापूस विक्रीचे नियोजन करावे, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com