
Market Bulletin
सोयाबीनमध्ये चढ उतार
आंतरराष्ट्रीय बाजारात आज शुक्रवारच्या तुलनेत सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ९.८८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.
तर सोयापेंडच्या भावात सुधारणा होऊन ३१५ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते. देशात मात्र सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. सोयाबीनला आजही सरासरी ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीनच्या भावावर यंदा पुरवठा वाढीचा दबाव आहे. हा दबाव आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापूस दबावातच
देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच आहे. कापसाची आवक सध्या शिगेला पोचली आहे. त्याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसत आहे. कापसाचे भाव हंगाम सुरु झाल्यापासूनच दबावात आहेत.
आजही देशातील बाजारात २ लाखांपेक्षा अधिकची आवक झाली होती. त्यामुळे कापसाचा भाव आजही देशातील बाजारात ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते. तर सरकीचे भावही टिकून आहेत. बाजारातील कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
गव्हाचे भाव तेजीतच
देशातील बाजारात सध्या गव्हाचा पुरवठा कमीच आहे. त्यामुळे गव्हाच्या भावातील सुधारणा कायम आहे. एफसीआयने स्टाॅकमधील गहू विक्रीदेखील वाढीव दराने केली होती. त्यामुळे बाजारात गव्हाचे भाव काही दिवस कमी झाल्यानंतर पुन्हा एका सुधारले होते.
सध्या बाजारात गव्हाला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाची लागवड वाढत आहे. नवा गहू बाजारात येण्याच्या तोंडावर गव्हाच्या भावात काहीशी नरमाई येऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
मक्याचे दर टिकून
मक्याचा बाजार मागील आठवड्यांपासून स्थिरावला आहे. बाजारातील मक्याची आवक आणि मागणी यामुळे बाजार स्थिरावल्याचे खरेदीदार सांगत आहेत. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून मक्याची बाजारातील आवकही स्थिरावली आहे. तर मालाची गुणवत्ता सध्या चांगली आहे.
त्यामुळे मक्याचा सरासरी भाव राज्यात सध्या २ हजार १०० ते २ हजार २०० रुपये दिसून येत आहे. यापुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर मक्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे मक्याचे बाजारभाव आणखी सुधारतील, असा अंदाज मका बाजारतील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ज्वारी दबावातच
राज्यातील बाजारात ज्वारीचे भाव दबावातच आहेत. सध्या ज्वारीला हमीभावापेक्षा किमान २० टक्यांपर्यंत कमी भाव मिळत आहे. खरिपातील वाढलेले उत्पादन आणि बाजारातील आवक यामुळे दरावर दबाव आला आहे.
सध्या राज्यातील बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणानुसार प्रतिक्विंटल सरासरी २ हजार १०० ते २ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला. यंदा रब्बी ज्वारीचाही पेरा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा दबाव ज्वारीच्या भावावर येण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.