Agrowon Podcast : कांद्याचा बाजारभाव स्थिर; कापूस, सोयाबीन, तूर तसेच काय आहेत आजचे टोमॅटो दर?

Daily Commodity Rates : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, तूर आणि टोमॅटो पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Market Update
Market Update Agrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. सोयातेल आणि सोयापेंडच्या भावात सुधारणा झाली. मात्र सोयाबीन अद्यापही ९.८८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातही प्रक्रिया प्लांट्सनही सोयाबीनच्या खेरदी भावात क्विंटलमागे ५० ते ७५ रुपयांची वाढ केली होती.

पण बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणारा भाव कायम होता. आजही सोयाबीनचा सरासरी भाव ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीनच्या भावात चढ उतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Update
Agrowon Podcast : हिरवी मिरचीचा बाजार टिकून; कापूस, सोयाबीन, केळी आणि तीळ बाजारभावात चढ-उतार

कापूस दबावातच

देशात कापसाच्या बाजारावर सध्या आवकेचा दबाव आहे. कापसाची आवक सध्या शिगेला पोचली. आंतरराष्ट्रीय बाजारातही आजही देशातील बाजारात ६ हजार ९०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाले आहेत. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ६८ सेंट प्रतिपाऊंडवर होते. याचाही दबाव देशातील कापूस बाजारावर दिसत आहे. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांदा भाव टिकून

कांद्याच्या भावात झालेली पडझड मागील काही दिवसांपासून थांबली आहे. कांद्याचे भाव स्थिर दिसत आहेत. बाजारातील कांदा आवक मात्र काही प्रमाणात वाढताना दिसत आहे. तर उठावही चांगला आहे.

त्यामुळे कांद्याला बाजारात सरासरी १ हजार ७०० ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कांद्याची भावपातळी मागील काही दिवसांपासून दिसत आहे. पुढील दोन आठवड्यांनंतर देशभरातील कांदा आवक आणखी सुधारू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Update
Raisin Market : बेदाण्याच्या दरात पुन्हा तेजी; १५ दिवसांत २० रुपयांची वाढ

टोमॅटो नरमला

बाजारात सध्या टोमॅटोची आवक वाढत आहे. वाढत्या आवकेचा टोमॅटोच्या भावावर काही प्रमाणावर दबाव येत आहे. टोमॅटोच्या भावात झालेली घसरण आजही कायम होती. टोमॅटोचे भाव मागील ३ आठवड्यांमध्ये क्विंटलमागे ५०० ते ८०० रुपयांनी कमी झाले आहेत.

टोमॅटोला बाजारात सध्या १५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. इतरही भाजीपाल्याचे भाव कमी आहेत. त्याचाही दबाव टोमॅटो बाजारावर दिसून येत आहे. टोमॅटोची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला.

तुरीचे भाव नरमले

नव्या तुरीची देशातील काही बाजारात आवक सुरु झाली. सध्या नव्या तुरीची आवक खूपच आहे. आवकेचा दबाव वाढण्यासाठी किमान एक महिना लागेल. परंतु नवा माल बाजारात येण्याच्या सेंटीमेंटमुळे दरात नरमाई आली आहे.

देशातील बाजारात सध्या तुरीला ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तुरीला उठाव चांगला आहे. तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे. पुढील काही आठवड्यानंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com