Tur Procurement : हमीभावाने ४ हजार ७७६ क्विंटल तूर खरेदी

Tur Market : किंमत आधार योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रति क्विंटल ७५५० रुपये) तूर विक्रीसाठी पणन महासंघ अंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ३३ केंद्रांवर ३ हजार २९० शेतकऱ्यांनी नोंदणी केली.
Tur Procurement
Tur ProcurementAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : किंमत आधार योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रति क्विंटल ७५५० रुपये) तूर विक्रीसाठी पणन महासंघ अंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ३३ केंद्रांवर ३ हजार २९० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. शुक्रवार (ता. ४) पर्यंत ११ केंद्रांवर ३५९ शेतकऱ्यांची ४ हजार ७७६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या तुरीची किंमत ३ कोटी ५७ लाख ४५ हजार रुपयांवर होते.

परभणी जिल्ह्यात केंद्रीय नोडल एजन्सी नाफेडच्या (राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ) वतीने हमीभावाने तूर खरेदीकरिता राज्य सहकरी पणन महासंघ अंतर्गंतच्या परभणी, पेडगाव, झरी, वरपुड, जिंतूर, बोरी, भोगाव, सेलू, मानवत, रुढीपाटी, पाथरी, देवनांदरा, सोनपेठ, पालम, चाटोरी, पूर्णा, एरंडेश्‍वर, ताडकळस या १८ केंद्रांवर १ हजार ४६४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली.

Tur Procurement
Tur Procurement: तूर खरेदीत वाढ! अडीच लाख क्विंटलचा टप्पा पार

त्यापैकी ८१३ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर तूर घेऊन येण्यासाठी एसएमएस (संदेश) पाठविण्यात आले. शुक्रवार (ता. ४) पर्यंत पेडगाव, बोरी, सेलू, रूढी पाटी, देवनांद्रा, एरंडेश्वर या ६ केंद्रावर २११ शेतकऱ्यांची २ हजार ६५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या तुरीची किंमत १ कोटी ९७ लाख १ हजार ७२५ रुपये होते. हमीभावाने तूर खरेदीसाठी परभणी जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी १०.५० क्विंटल उत्पादकता निश्चित करण्यात आली असून, १० हजार २२५ टन तूर खरेदीचे उद्दिष्ट आहे.

Tur Procurement
Tur Procurement : ‘नाफेड’च्या पाच शासकीय केंद्रांवर तूर खरेदीचा प्रारंभ नाही

हिंगोली जिल्ह्यात केंद्रीय नोडल एजन्सी एनसीसीएफच्या (राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ) वतीने तूर खरेदी करिता राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गंत हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, सेनगाव, साखरा, शिवणी खुर्द, फाळेगाव, नागासिनगी, आडगाव, उमरा, पुसेगाव या १५ केंद्रांवर १ हजार ८२६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली त्यापैकी ८५३ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर तूर घेऊन येण्यासाठी एसएमएस (संदेश) पाठविण्यात आले.

शुक्रवार (ता. ४) पर्यंत हिंगोली, कनेरगाव, फाळेगाव, सेनगाव, नागसिनगी या ५ केंद्रांवर १४८ शेतकऱ्यांच्या २ हजार १२५क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. या तुरीची किंमत १ कोटी ६० लाख ४३ हजार ७५० रुपये होते. हिंगोली जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी ११.५० क्विंटल उत्पादकता निश्चित करण्यात आली असून ८ हजार ८६५ टन तूर खरेदीचे उद्दिष्ट आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com