
New York-Washington: भारत- पाकिस्तान यांच्यातील संघर्षाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जाहीर भाष्य करत यात पाच विमाने पाडण्यात आल्याचा दावा केला असून माझ्या हस्तक्षेपामुळेच हा संघर्ष थांबल्याचेही त्यांनी नमूद केले. ट्रम्प यांच्या विधानामुळे केंद्र सरकारची पुन्हा एकदा कोंडी झाली असून काँग्रेसने या प्रकरणी स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
दरम्यान या संघर्षामध्ये नेमकी कोणत्या देशाला पाच विमाने गमवावी लागली किंवा दोन्ही देशांना मिळून ही विमाने गमवावी लागली का याचा स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला दिसत नाही. ट्रम्प यांच्या या दाव्याचे भारत सरकारने याआधीही जाहीर खंडन केले होते.
ट्रम्प यांनी शुक्रवारी रिपब्लिकन पक्षाच्या सिनेटरसाठी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षामध्ये जवळपास चार ते पाच विमाने पाडण्यात आली होती. हा संघर्ष पुढे अधिक तीव्र होत चालला होता. दोन अण्वस्त्र संपन्न देश परस्परांवर आघात करत होते. पण आम्ही यामध्ये हस्तक्षेप करत व्यापाराच्या माध्यमातून दोन्ही देशांना एकत्र आणले.
दोन्ही देशांना आमच्याशी व्यापार करार करायचा होता पण आम्हीच अट घातली की तुम्ही जर असेच भांडत राहिलात तर कोणताही व्यापार करार होणार नाही. हे दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न असल्याने कदाचित त्यांनी परस्परांवर अणुहल्ला देखील केला असता.’’ ट्रम्प यांनी यावेळी त्यांच्या प्रशासनाचे देखील कौतुक केले.
‘‘आम्ही जे काम केले ते इतरांना करण्यासाठी आठ वर्षांचा अवधी लागला असता. काही गोष्टींचा मला खूप अभिमान आहे. आम्ही असंख्य युद्धे रोखून दाखविली आणि ती खरोखरच गंभीर होती,’’ असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या ‘टीआरएफ’ संघटनेला अमेरिकेने नुकतेच दहशतवादी संघटनांच्या यादीमध्ये टाकले होते. यावरून पाकिस्तानकडून आदळआपट सुरू असतानाच आज ट्रम्प यांनी हे विधान केल्याने जागतिक समुदायाच्या भुवया उंचावल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.