
Newyork News : रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यावर मात करून अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळविला आहे. ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष असतील.
अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलेली सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती होण्याचा इतिहास डोनाल्ड ट्रम्प यांनी घडवला आहे. एक उद्योजक, दिग्गज बांधकाम व्यावसायिक, ‘रिॲलिटी टीव्ही स्टार’ अन् दोषी ठरवले गेलेले देशाचे पहिले माजी अध्यक्ष आणि आता पुन्हा महासत्ता अमेरिकेचे अध्यक्ष अशी ट्रम्प यांची थक्क करणारी वाटचाल आहे.
२०२४ च्या आपल्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारमोहिमेदरम्यान दोन जीवघेण्या हल्ल्यांतून वाचल्यानंतर ७८ वर्षीय ट्रम्प डगमगले नाहीत. त्यांनी धडाडीने आपली प्रचारमोहीम राबवली. अमेरिकन मतदारांनीही त्यांना बहुमत बहाल करत अध्यक्षपदाच्या दुसऱ्या पर्वासाठी संधी दिली. त्यांच्या या यशामुळे कमला हॅरिस यांचे अमेरिकेची पहिली महिला अध्यक्ष होऊन इतिहास घडविण्याचे स्वप्न भंगले. डेमोक्रॅटिक पक्ष आणि त्यांच्या लाखो समर्थकांचाही भ्रमनिरास झाला.
२०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झाल्याने ट्रम्प यांना हे पद सोडावे लागले. तेव्हापासून यंदा २०२४ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी या पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत भाग घेण्यापर्यंत ट्रम्प यांनी स्वतःला सतत चर्चेत ठेवले. वादग्रस्त का होऊना पण स्वतःवर प्रकाशझोत राहील याची त्यांनी काळजी घेतली.
त्यामुळे अमेरिकन जनमानसावर आपला पगडा कायम ठेवण्यात त्यांना यश आले. २०२० च्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांची अध्यक्षपदी झालेली निवड स्वीकारण्यास त्यांनी ठाम नकार दिला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.