Soybean Sale : दरवाढीच्या प्रतीक्षेतील सोयाबीन विक्रीला

Soybean Market : गेले अनेक दिवस सोयाबीनच्या दरवाढीची प्रतीक्षा करूनही दरांमध्ये सुधारणा होत नसल्याने साठवलेले सोयाबीन शेतकरी विक्रीला आणत आहेत.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

Akola News : गेले अनेक दिवस सोयाबीनच्या दरवाढीची प्रतीक्षा करूनही दरांमध्ये सुधारणा होत नसल्याने साठवलेले सोयाबीन शेतकरी विक्रीला आणत आहेत. सोयाबीनच्या दरात वाढ होऊ शकलेली नाही. सोयाबीनची आवक हजार पोत्यांपेक्षा अधिक होत आहे.

पश्‍चिम विदर्भात अकोला बाजारपेठेत सोयाबीनची सर्वाधिक उलाढाल होत असते. यंदाच्या हंगामात सोयाबीनचा कमाल दर साडेचार हजारांच्या आसपास टिकून राहिलेला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला किमान ४०५० रुपये दर होते. कमाल दर ४४५५ रुपये, तर सरासरी ४२६५ रुपये दर मिळाला. तर आवक १०२८ क्विंटल झाली.

Soybean
Soybean Rate : हिंगोली बाजार समितीत सोयाबीनचे दर दबावातच

मागील काही दिवसांत प्रतिदिन दीड हजार क्विंटलपर्यंत आवक झाली. आता सततच्या पावसामुळे आवकेवरही परिणाम दिसून येत आहे. सोयाबीनची किमान आवक १०२८ क्विंटलपर्यंत खाली आली. यंदाच्या हंगामात सोयाबीनची पुन्हा एकदा सर्वाधिक लागवड जिल्ह्यात झालेली आहे.

Soybean
Soybean Pest : सोयाबीन केसाळ अळी नियंत्रणासाठी उपाय

सध्या पिकाची अवस्था चांगली आहे. नवीन सोयाबीन बाजारात यायला आणखी दोन ते अडीच महिन्यांचा काळ लागेल. तोपर्यंत बाजारात साठविलेली सोयाबीनच विक्रीला येणार आहे, असे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. सध्या दरांमध्ये फारशी सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत. परिणामी शेतकरी आता सोयाबीन विक्रीला काढू लागले आहेत.

तूर सरासरी १०४०० रुपये क्विंटल

बाजार समितीत तुरीची आवक बरीच कमी झालेली आहे. गुरुवारी (ता. २५) २०० क्विंटलच्या आत आवक झाली. तुरीला सरासरी दर १०४०० रुपये मिळाला. तर किमान दर ८००० व कमाल ११००५ रुपये मिळाला. हरभरा किमान ५२०० व कमाल ६७२५ रुपये दराने विकत आहे. हरभऱ्याची आवक २५० क्विंटलपर्यंत होत असून सरासरी दर ६२७५ रुपये मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com