Hingoli News : हिंगोली बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारात शुक्रवारी (ता. १९) सोयाबीनची ४१५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ४११० ते कमाल ४४७१ रुपये, तर सरासरी ४३०५ रुपये दर मिळाले.
गेल्या काही आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात किंचित चढ-उतार होत आहेत. किमान दर चार हजार रुपयांच्या नजीक तर कमाल दर साडेचार रुपयांच्या आतच आहेत. मागील अनेक महिन्यांपासून सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांच्या आतच आहेत. दरात मोठी सुधारणा होत नसली, तरी यंदाच्या खरिपात जिल्ह्यातील सोयाबीनचा पेरा अडीच लाख हेक्टरच्या जवळ पोहोचला आहे.
गतवर्षीच्या हंगामातील सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. खरिपातील पीक व्यवस्थापनाची कामे सुरू असल्यामुळे हिंगोली धान्य बाजारातील सोयाबीनची आवक कमी आहे. गेल्या आठवड्यात प्रतिदिन ३०० ते ८०० क्विंटल आवक झाली. मंगळवारी (ता.१६) सोयाबीनची ३११ क्विंटल आवक तर दर किमान ४११० ते कमाल ४४५१ रुपये तर सरासरी ४३१६ रुपये मिळाले.
सोमवारी (ता. १५) सोयाबीनची ४५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४१०० ते कमाल ४४८० रुपये तर सरासरी ४२९० रुपये दर मिळाले. शनिवारी (ता.१३) सोयाबीनची ५०० क्विंटल आवक होऊन किमान ४०९० ते कमाल ४४८० रुपये तर सरासरी ४२८५ रुपये दर मिळाले.
शुक्रवारी (ता.१२) सोयाबीनची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४१०० ते कमाल ४५०० रुपये तर सरासरी ४३०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ११) ८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४००५ ते कमाल ४४५० रुपये तर सरासरी ४२२७ रुपये दर मिळाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.